Norway : Corona Vaccine ! लसीकरणानंतर 23 लोकांचा मृत्यू, नॉर्वेने कोरोनाच्या वॅक्सीनवर जगाला केले सावध

नॉर्वे : जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दरम्यान, नॉर्वेने  (Norway) दावा केला आहे की, व्हॅक्सीन देण्यात आल्यानंतर येथे 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉर्वेमध्ये (Norway) अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या फायजरच्या व्हॅक्सीनचा वापर केला जात आहे. नॉर्वेने (Norway) आपल्या दाव्यात म्हटले की, व्हॅक्सीनेशननंतर मृत्यू पावलेले लोक ज्येष्ठ होते. सध्या देशात 33,000 लोकांना व्हॅक्सीनचा पहिला डोस मिळाला आहे. नॉर्वेमध्ये (Norway) लसीकरणानंतर मरण पावलेले लोक खुप वृद्ध होते. मृतांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे. अनेकजण 90 वर्षापेक्षा जास्त वयाचे होते.

मागील वषी 26 डिसेंबरपासून नॉर्वेमध्ये लसीकरण प्रक्रिया सुरू झाली होती. नॉर्वे सरकारने म्हटले की, व्हॅक्सीन ज्येष्ठ आणि अगोदरपासून आजारी लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. नॉर्वेजियन मेडिसिन एजन्सीनुसार, 23 मृत्यूंपैकी 13 जणांची ऑटोप्सी करण्यात आली आहे, ज्याच्या अहवालावरून समजले की, व्हॅक्सीनच्या सामान्य दुष्परिणामांनी सुद्धा आजारी आणि ज्येष्ठ लोकांवर गंभीर परिणाम केला.

गंभीर आजारी लोकांसाठी साइड इफेक्ट्सचे गंभीर परिणाम
नॉर्वेजियन इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने म्हटले, गंभीर आजारी लोकांसाठी हलक्या व्हॅक्सीन साइड इफेक्ट्सचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्यांचे आयुष्य खुप कमी राहिले आहे त्यांच्यावर व्हॅक्सीनचा प्रभाव खुपच कमी होऊ शकतो.

अन्य देशांनी गंभीर नजर ठेवावी
नॉर्वेने म्हटले आहे की, या सिफारशीचा अर्थ हा बिलकुल नाही की तरूण आणि निरोगी लोकांनी लस घेऊ नये, परंतु हा या गोष्टीचा एक प्रारंभिक संकेत आहे की, अन्य देशांना यावर गंभीर नजर ठेवावी लागेल. युरोपीय मेडिसिन एजन्सीचे प्रमुख एमर कुक यांनी म्हटले की, कोविड व्हॅक्सीनच्या सुरक्षेवर देखरेख ठेवावी लागेल.

वृत्तसंस्था ब्लूमबर्गनुसार, फायजरने एका वक्तव्यात म्हटले,फायजर आणि बायोएनटेक नॉर्वेमध्ये झालेल्या मृत्यूंच्या चौकशीसाठी नॉर्वे एजन्सीसोबत काम करत आहे, एजन्सीला आढळले की, आतापर्यंतची संख्या धोकादायक नाही.