तरुणाने YouTube वर पाहून बनवला गावठी बॉम्ब, पण निकामी करता न आल्याने केलं हे कृत्य, नागपूरातील प्रकार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एका 25 वर्षीय तरुणाने यु ट्युबवरील ( YouTube) व्हिडीओ (Video) पाहून चक्क गावठी बॉम्ब बनवल्याची (Made Bomb at home) घटना नागपूरमधून समोर आली आहे. आरोपीने तरुणाने YouTube वर सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्यांची जुळवाजुळव केली. यानंतर डोक लावून घरात बॉम्ब तयार देखील केला. पण बनवलेला बॉम्ब निकामी (Bomb defused) करता न आल्याने त्याची पुरती फजिती झाली. अखेर बॉम्ब नाशक पथकाने बॉम्ब निकामी केला. मात्र तरुणाच्या या खोडसाळपणामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pravin Darekar | राजकारण नाही तर शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय, संजय राऊतांना उपरोधक टोला

राहुल पगाडे Rahul Pagade (वय 25, रा. साईबाबानगर, नागपुर) असे बॉम्ब बनवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गावठी बॉम्ब बनवण्याचे व्हिडीओ YouTube वर पाहून त्याकरीता लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव (Matching of materials) करून त्याने बॉम्ब तयार केला होता. मात्र तो निकामी करता न आल्याने आरोपीने बॉम्ब पिशवीत टाकून थेट नंदनवन पोलीस ठाणे Nandanvan Police Thane गाठले. खाद्यपदार्थ घेऊन यावे तसे तो पिशवीत बॉम्ब घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. तरुणाचा हा कारनामा पाहून पोलिसही घाबरले होते. पण त्यानंतर पोलिसांनी तातडीने बॉम्ब नाशक पथकाला पाचारण केले. कठोर मेहनतीनंतर बीडीडीएस BDDS पथकाने हा गावठी बॉम्ब इलेक्ट्रिक सर्कीट बॅटरी पासून वेगळा करून निकामी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकाविरूध्द गुन्हा Crime दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास नंदनवन पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : 25 years old young man from nagpur made a bomb after watching a video on youtube arrest

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा