वीजेचा शॉक देऊन 28 वर्षीय पतीने केली 51 वर्षीय पत्नीची हत्या

तिरुअनंतपुरम: पोलिसनामा ऑनलाईन – वीजेचा शॉक देऊन २८ वर्षीय व्यक्तीने ५१ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना केरळमधील तिरुअनंतपुरम येथे समोर आली आहे. ५१ वर्षीय शखाकुमारी यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील परिसरात आढळला होता. प्राथमिक चौकशीदरम्यान पती अरुण याने घरात ख्रिसमच्या निमित्ताने करण्यात आलेल्या रोषणाईमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला होता परंतु पोलिसीखाक्या दाखवताच अरुणने खुणाची कबूली दिली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच अरुण आणि शखाकुमारी यांचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर त्यांच्यात सतत वाद होत होते. अरुण वारंवार घटस्फोटाची मागणी होत असतानाही शखाकुमारी मात्र नकार देत होती. अरुणने याआधीही एकदा पत्नीला शॉक देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अपयशी ठरला. अरुणने पत्नीची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.

शनिवारी सकाळी अरुणने शखाकुमारीला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात अरुणने पत्नीला शॉक लागल्याचा दावा केला होता. तपासादरम्यान पोलिसांना घरात रक्ताचे डाग दिसल्याने शंका आली. यामुळे यामागे काहातरी काळबेर असल्याची शंका पोलिसांना आली.चौकशीदरम्यान अरुणने आपला गुन्हा कबूल केला असून वीजेचा शॉक देऊन पत्नीची हत्या केल्याच सांगितलं आहे.