राज्यातील 29 सहाय्यक पोलिस आयुक्‍तांना उपायुक्‍तपदी बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य पोलीस दलातील तब्बल 29 सहाय्यक पोलीस आयुक्‍तांना पोलीस उपायुक्‍तपदी / अप्पर पोलीस अधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्‍तांच्या बढतीबाबतचे आदेश आज (बुधवारी) सायंकाळी निर्गमित करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन सहाय्यक आयुक्‍तांचे प्रमोशन पेंडिग होते तर गेल्या काही महिन्यांपासुन अनेक पोलीस निरीक्षकांचे सहाय्यक आयुक्‍तपदीचे प्रमोशन पेडिंग आहे. 29 सहाय्यक आयुक्‍तांची बढतीवर बदली करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf52874d-d20d-11e8-9107-b3f5baf9cf08′]
सहाय्यक पोलीस आयुक्‍त ते पोलीस उपायुक्‍त/अप्पर पोलीस अधिक्षकपदी बढती झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात बढतीवर बदली कोठे झाली आहे हे पुढील प्रमाणे. मारूती नारायण जगताप (सहाय्यक आयुक्‍त, ठाणे शहर ते पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई), सागर नेताजी पाटील (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते अप्पर पोलीस अधिक्षक, अहमदनगर), बापु विठ्ठल बांगर (सहाय्यक आयुक्‍त, नाशिक शहर ते पोलीस उपायुक्‍त, सोलापूर शहर -गुन्हे शाखा), गजानन एस. राजमाने (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा उपविभाग, सातारा ते पोलीस उपायुक्‍त, नागपूर शहर), श्रीमती शर्मिला सुभाषराव घारगे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जत उपविभाग, सांगली ते पोलीस अधिक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, अमरावती), आनंद ए. भोईटे (पोलीस उप अधिक्षक, शिर्डी देवस्थान- प्रतिनियुक्‍तीने ते पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), श्रीमती वैशाली ईश्‍वर कडुकर (उप अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक), दत्‍ता किसन नलावडे ( उपविभागीय अधिकारी, महाड उपविभाग, रायगड ते पोलीस उपायुक्‍त, मुंबई शहर), सचिन सुरेश पांडकर (उपविभागीय अधिकारी, कणकवली उपविभाग, सिंधुदुर्ग ते पोलीस अधिक्षक, सायबर सुरक्षा, विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर सुरक्षा, मुंबई यांचे कार्यालय), अजय लक्ष्मण देवरे (सहाय्यक आयुक्‍त, नाशिक शहर ते पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक), राजु एन. भुजबळ (उपविभागीय अधिकारी, यवतमाळ उपविभाग, यवतमाळ ते अप्पर अधिक्षक, धुळे), यशवंत अशोक काळे (उपविभागीय अधिकारी, परभणी ते अप्पर अधिक्षक, हिंगोली), डॉ. राहुल धर्मराज खाडे (उप अधिक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते पोलीस उपायुक्‍त, औरंगाबाद शहर), सचिन पांडुरंग गोरे (उपविभागीय अधिकारी, पेठ उपविभाग, नाशिक ग्रामीण ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 06, धुळे), श्रीमती चेतना शेख तिडके (पोलीस उपाधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते पोलीस अधिक्षक, नागरी हक्‍क संरक्षण,
 नागपूर), खंडेराव आप्पा धरणे (सहाय्यक आयुक्‍त, ठाणे शहर ते पोलीस अधिक्षक, राज्य मानवी हक्‍क आयोग, मुंबई), विशाल हिरालाल ठाकुर (पोलीस उपाधिक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते पोलीस उपायुक्‍त, मुंबई शहर), श्रीमती जयश्री तानाजी गायकवाड (एसीपी, पुणे शहर ते अप्पर अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर), विजयकुमार सुरेश चव्हाण (उपविभागीय अधिकारी, चोपडा उपविभाग, जळगांव ते अप्पर अधिक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक), दिपक विठ्ठल गिर्‍हे (एसीपी, नाशिक शहर ते अप्पर अधिक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), धिरज शंकर पाटील (उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी, कोल्हापूर ते अप्पर अधिक्षक, सातारा), अभिजित सुरेश शिवथरे (उपविभागीय अधिकारी, शिर्डी, अहमदनगर ते पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई), गणेश नामदेव गावडे (एसीपी, पुणे शहर ते अप्पर अधिक्षक, भोकर, नांदेड), विजय व्यंकटराव कबाडे (उपविभागीय अधिकारी, बार्शी, सोलापूर ग्रामीण ते समादेशक, एसआरपीएफ गट क्रं. 13, वडसा, देसाईगंज), सुनिल कृष्णा लांजेवार (उपविभागीय अधिकारी, वैजापूर, औरंगाबाद ग्रामीण ते पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), विक्रांत विश्‍वास देशमुख ( उपाधिक्षक, एटीएस ते अप्पर अधिक्षक, अकोला), अतुल उत्‍तम झेंडे ( उपविभागय अधिकारी, नाशिक ग्रामीण ते पोलीस अधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अप्पर महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा यांचे कार्यालय, मुंबई), हिम्मत हिंदूराव जाधव (उपविभागीय अधिकारी, लातूर उपविभाग, लातूर ते पोलिस अधिक्षक, नक्षल विरोध अभियान, नागपूर) आणि दत्‍तात्रय बापू कांबळे (सहाय्यक पोलीस आयुक्‍त, पुणे ते पोलीस उपायुक्‍त, मुंबई शहर).

 

You might also like