J & K : पोलिसांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा, निर्दोष असल्याचा कुटुंबाचा दावा

जम्मू : वृत्तसंस्था –  जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. पोलिस आणि लष्कराकडून संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. या चकमकीत ठार झालेल्या मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असून दुसरा 11 वीत शिकत होता असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. बनावट चकमकीत त्यांची हत्या करुन ते दहशतवादी असल्याचा दावा केला जात असल्याचे कुटुंबीयांच म्हणणे आहे.

पोलिसांकडून ठार मारण्यात आलेले तिघेही दहशतवादी होते असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच रेकॉर्डमध्ये त्यांची दहशतवादी म्हणून नोंद नव्हती अशी माहिती दिली आहे. ठार करण्यात आलेल्या तिनही दहशतवाद्यांचा आमच्या यादीत उल्लेख नसला तरी त्यातील दोघे कट्टर दहशतवादी होते, अशी माहिती पोलिसांनी त्यांच्या निवेदनात दिली आहे.

पोलिसांनी यावेळी OGW किंवा Over ground worker असा उल्लेख केला आहे. जम्मू काश्मिरमधील एखाद्या व्यक्तीचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय असल्याचा हा शब्द वापरला जातो. पोलिसांनी चकमकीत ठार झालेला एकजण हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रईस कचरु याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. 2017 मध्ये रईस ठार झाला होता. बुधवारी चकमकीत ठार झालेल्याची ओळख पटली असून यामध्ये एजाज गणी, अथक मुश्ताक आणि झुबीर अशी नावं आहेत. एजाज हा हेड कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याचे नातेवाईकांचं म्हणण आहे.