3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; टायटन बुल्स्, सॅफरॉन क्रिकेट क्लब संघांचा तिसरा विजय !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत टायटन बुल्स् आणि सॅफरॉन क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून तिसरा विजय नोंदविला. युनायटेड थंडरझ् संघाने पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विक्रम राव याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टायटन बुल्स् संघाने सेकंड इनिंग इलेव्हनचा ६ गडी राखून पराभव केला. संघाच्या विजयामध्ये विक्रम राव याने १८ धावात ४ गडी बाद करत महत्वाची भूमिका बजावली. सुरज उंडागे याच्या गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड थंडरझ् संघाने राईझिंग बॉईजाचा ४ गडी राखून पराभव करत गुणांचे खाते उघडले.

अनिकेत अटकरी याच्या अष्टपैलू खेळीमुळे सॅफरॉन क्रिकेट क्लबने ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा एका धावेनी निसटता विजय मिळवून सलग तिसरा विजय नोंदविला. संकेत जोशी (५३ धावा) आणि कृष्णा भट (४० धावा) यांच्या फलंदाजीमुळे सॅफरॉन क्रिकेट क्लबने १९८ धावा धावफलकावर लावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वैभव लवांडे (४७ धावा), शैलेश साठे (३६ धावा) आणि निशांत सिंग (नाबाद ४३ धावा) यांनी संघाला विजयाच्या समीप नेले. सॅफरॉनच्या नचिकेत कुकलर्णी (३-२२) आणि कुणाल सुर्वे (२-४१) यांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या अचूक मार्‍यासमोर ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबपासून विजय केवळ एक धाव दूर राहीला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सेकंड इनिंग इलेव्हनः १८ षटकात १० गडी बाद १०७ धावा (आदित्य आर. ४१, विक्रम राव ४-१८, सुनिल यादव ३-१६,
अलिअसगर बोहारी २-७) पराभूत वि. टायटन बुल्स्ः १४ षटकात ४ गडी बाद ११२ धावा (मोहम्मद लोखंडे ३५,
अनुराग मोईत्रा २०, अभिषेक श्रीवास्तव १९); विक्रम राव;

सॅफरॉन क्रिकेट क्लबः २० षटकात १० गडी बाद १९८ धावा (संकेत जोशी ५३ (३२, ७ चौकार, २ षटकार), कृष्णा भट ४०,
अनिकेत अटकरी १८, राहूल कोठावडे ३-३९, प्रविण मिना २-३०) वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद
१९७ धावा (वैभव लवांडे ४७, शैलेश साठे ३६, निशांत सिंग नाबाद ४३, केतन कुरवाळकर २१, अनिकेत अटकरी २-१९,
नचिकेत कुकलर्णी ३-२२, कुणाल सुर्वे २-४१); सामनावीरः अनिकेत अटकरी;

राईझिंग बॉईजः १५.१ षटकात १० गडी बाद १११ धावा (रोहन साळुंखे २४, लखन परासे १७, सुरज उंडागे ४-३९,
आदित्य करजटकर २-१०, शराफत अली शहा २-२२) पराभूत वि. युनायटेड थंडरझ्ः १३.४ षटकात ६ गडी बाद ११२
धावा (सिध्दार्थ रोमन ४०, पलाश कोंढारे ३०, सुरज झा ३-१५, राकेश कुमार २-२६); सामनावीरः सुरज उंडागे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट