3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; रायझिंग स्टार्स, लिजंड्स स्पोर्ट्स क्लब संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार्स संघाने पाचवा विजय तर, लिजंड्स स्पोर्ट्स क्लब संघाने तिसरा विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुंज एस. याच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर रायझिंग स्टार्स संघाने ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा ४२ धावांनी पराभव करून पाचवा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाज करताना रायझिंग स्टार्स संघाने १९८ धावांचे आव्हान उभे केले. कुंज एस. याने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह ८८ धावांची खेळी केली. हेमंत पाटील याने ६५ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ४६ चेंडूत ९१ धावांची भागिदारी केली. या धावसंख्येसमोर ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा डाव १५६ धावांवर मर्यादित राहीला. हेमंत रावत याने नाबाद ५१ धावांची खेळी केली.

हृषीकेश पवार याच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने कल्याण इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव करून तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना कल्याण इलेव्हन संघाने १५२ धावांची खेळी केली. अमर खेडेकर याने ४४ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. हृषीकेश पवार याने २३ धावात ४ गडी टिपले. विपुल खैरे (२-१७) आणि गिरीष ओक (२-२१) यांनीही अचूक गोलंदाजी केली. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने १९.१ षटकात आव्हान पूर्ण केले. शंतनु आठवले (३० धावा), अभिषेक बोधे (नाबाद ३२ धावा) आणि अमित गणपुले (नाबाद ३९ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
रायझिंग स्टार्सः २० षटकात ६ गडी बाद १९८ धावा (कुंज एस. ८८ (४१, ११ चौकार, ५ षटकार), हेमंत पाटील ६५
(४६, ९ चौकार, २ षटकार), नीरज शर्मा ३-३५); (भागिदारीः हेमंत आणि कुंज यांच्यात तिसर्‍या गड्यासाठी ९१ (४६)
वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १५६ धावा (हेमंत रावत नाबाद ५१ (३३, ४ चौकार, ४ षटकार),
नेल्सन अरीक २७, नीरज शर्मा २०, गौतम तुळपुळे ३-३०, गौरव बाबर २-२२, अभिषेक कौशिक २-३७); सामनावीरः कुंज एस.;

कल्याण इलेव्हनः २० षटकात १० गडी बाद १५२ धावा (अमर खेडेकर ४४, रोहीत गुगळे १८, हृषीकेश पवार ४-२३,
विपुल खैरे २-१७, गिरीष ओक २-२१) पराभूत वि. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः १९.१ षटकात ६ गडी बाद १५३ धावा
(शंतनु आठवले ३० (१५, १ चौकार, ३ षटकार), अभिषेक बोधे नाबाद ३२, अमित गणपुले नाबाद ३९); सामनावीरः हृषीकेश पवार.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 46 वी स्थानबध्दतेची कारवाई