Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 46 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत गंभीर गुन्हे करुन परिसरात दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 46 वी कारवाई आहे. (Pune Police MPDA Action)

फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस Faizan Ramzan Alias Kader Shaikh Alisa Pacchis (वय-20 रा. गल्ली नं. 19/ए, सैय्यदनगर महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याने साथीदारांसह वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता यासारख्या हत्यारांसह फिरताना शस्त्राने गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस याच्या विरोधात मागील पाच वर्षात 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस
याला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Patare) व
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (PI AT Khobre) यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray | ‘तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर, नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारवर टीकास्त्र

Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

Aaditya Thackeray On Nanded-Sambhajinagar Patients Death Incident | हे सगळं भयानक… शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय?, नांदेड, संभाजीनगरच्या घटनांवर आदित्य ठाकरेंचा संताप

IPS Rajnish seth – MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) मिळाले अध्यक्ष; राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे पदभार; नवीन DGP कोण?