3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

सॅफरॉन क्रिकेट क्लब, रायझिंग बॉईज संघांची विजयी कामगिरी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament) सॅफरॉन क्रिकेट क्लब आणि रायझिंग बॉईज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नचिकेत कुलकर्णीच्या अष्टपैलू खेळीमुळे सॅफरॉन क्रिकेट क्लबने युनायटेड इलेव्हन संघाचा १०१ धावांनी सहज पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सॅफरॉन क्रिकेट क्लबने २५१ धावांचा डोगर उभा केला. संकेत जोशी याने ४१ चेंडूत १५ चौकार आणि ५ षटकारांसह १०२ धावांची खेळी केली. नचिकेत कुलकर्णी याने ४० धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ५१ चेंडूत ११२ धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर युनायटेड इलेव्हनचा डाव १५० धावांवर आटोपला. नचिकेत कुलकर्णी याने ३३ धावात ५ गडी टिपत विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.

चित्तरंजन रे याच्या शतकी खेळीच्या जोरावर रायझिंग बॉईज संघाने लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा ७ गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करता १४४ धावा धावफलकावर लावल्या. रायझिंग बॉईज संघाच्या चित्तरंजन रे याने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ११ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. विग्नेश पालवणकर याने ३० धावा केल्या. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ६१ चेंडूत १२४ धावांची भागिदारी करून संघाला सहज मिळवून दिला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

सॅफरॉन क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद २५१ धावा (संकेत जोशी १०२ (४१, १५ चौकार, ५ षटकार),
नचिकेत कुलकर्णी ४०, अनिकेत अटकरी नाबाद ३२, ओजस साठे ३३, ओंकार गोखले २-४५);
(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी नचिकेत आणि संकेत यांच्यात ११२ (५१) वि.वि. युनायटेड इलेव्हनः १७.२ षटकात १० गडी
बाद १५० धावा (भावेश पाटील ३३, रितेश साळी २६, नचिकेत कुलकर्णी ५-३३, कुणाल सुर्वे ३-१७);
सामनावीरः नचिकेत कुलकर्णी;

लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः १७.३ षटकात १० गडी बाद १४४ (अभिषेक बोधे ३२, सौरभ रवालिया २०, सुरज झा ३-२१,
आशितोष देशमुख ३-३९) पराभूत वि. रायझिंग बॉईजः १२.५ षटकात ३ गडी बाद १४८ धावा
(चित्तरंजन रे १०० (४४, ६ चौकार, ११ षटकार), विग्नेश पालवणकर ३०, अभिषेक बोधे १-८);
(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी चित्तरंजन आणि विग्नेश १२४ (६१); सामनावीरः चित्तरंजन रे;

Madhe Ghat Waterfall | पुणे : वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात 60 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

ACB Trap News | महार वतनाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणात 6 बडया शासकीय अधिकाऱ्यांसह 38 जणांवर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR; अहमदनगरसह राज्यात खळबळ, जाणून घ्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे