400 वर्ष जुन्या ‘या’ मंदिरात चक्क ‘रोबोट’ बनला ‘पुजारी’, करतो ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साधारणत: मंदिरात पुरुष पुजारी असल्याचे आपण पाहतो. बदलत्या काळानुसार स्त्रिया देखील काही ठिकाणी पुजारी म्हणूनही काम करतात. मात्र तुम्ही कधी रोबोटने पुजारी म्हणून काम केलेले पाहिले आहे का? होय, एका रोबोटला जपानमधील ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नेमले गेले आहे.

या रोबोचे नाव अँड्रॉइड कॅनॉन असे असून त्याला क्योटोच्या कोडगी मंदिरात नियुक्त केले गेले आहे. हा यंत्रमानव मंदिरात हात जोडून प्रार्थना करतो आणि तेथे येणाऱ्या सर्व यात्रेकरु-भक्तांना दया, करुणा आणि सदभावना शिकवतो. त्याच वेळी, मंदिरातील इतर पुजारी देखील या कामात रोबोटला मदत करतात.

मंदिराचे पुजारी तेंशो गोटो म्हणतात की, हा रोबोट कधीही मरणार नाही. तर कालांतराने ते स्वतःच विकसित होत जाईल, अशी या रोबोटची खासियत आहे. रोबोटकडून आम्हाला आशा आहे की, बदलत्या बौद्ध धर्माच्या अनुषंगाने त्याचे ज्ञान वाढेल, लोकांना त्याच्याकडून सर्वात कठीण संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.

कसा आहे हा रोबोट :
हा पुजारी रोबोट सुमारे सहा फूट उंच असून त्याचे हात, चेहरा आणि खांदे मानवी त्वचेसारखे दिसणारे सिलिकॉनचे बनलेले आहेत. मात्र, त्याच्याकडे पाहिल्यावर तो रोबोट असल्याचे सहज कळून येते. हा रोबो तयार करण्यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च झाले आहेत. ओसाका विद्यापीठाचे प्रख्यात रोबोटिक्स प्रोफेसर आणि जेन टेम्पल यांच्या सहकार्याने त्याला तयार केले गेले आहे. हा रोबोट लोकांना राग आणि अहंकाराच्या दुष्परिणामांविषयी देखील सांगतो.

आरोग्यविषयक वृत्त –