काय सांगता ! होय, 72 लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली 510 कोटीची बोली

पोलीसनामा ऑनलाईन – राजस्थानातील कुईयां (जि. अमुमानगढ) या गावात सध्या मद्यविक्रीचा दुकानाचा लिलाव सुरु आहे. या दुकानावर आपलाच ताबा असावा यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये चढाओढ सुरु आहे. दोघीमध्ये तू- तू मी- मी करत सकाळी 11 वाजता सुरु झालेली ही लिलावाची प्रक्रिया रात्री दोन वाजता संपली. कुटुंबातील एका महिलेने 72 लाखाचे दुकान चक्क 510 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. इतकी मोठी बोली लागल्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही बोली प्रक्रिया बंद केली होती. परंतु मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 15 वर्ष जुनी व्यवस्था संपवून पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरू केली. यातून सरकारला हजारो कोटी रूपयांचा महसूलही मिळत आहे.

510 कोटी रूपयांची बोली लावणाऱ्या या महिलेचे नाव किरण कंवर असे आहे. या महिलेला येत्या दोन दिवसांच्या आत ही रक्कम जमा करण्याचे निर्देश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. गेल्यावर्षी याच गावातील मद्यविक्रीच्या दुकानाची 65 लाखांना विक्री झाली होती. यंदा या दुकानासाठी 72 लाखांपासून बोली सुरु झाली. सकाळी 11 वाजता सुरु झालेली बोली रात्री 2 वाजता संपली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी पुढील कायर्वाही सुरु केली. तसेच या लिलावाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी त्यांना अलॉटमेंट लेटर जारी केल आहे. तसेच जर विजेत्याने आता दुकान विकत घेतल नाही तर पुढील वेळेपासून त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये या प्रक्रियेद्वारे मद्यविक्रीच्या दुकानाचा लिलाव करण्याला काहीनी विरोध केला आहे.