‘त्या’ वृद्धाच्या शरीरातून काढले तब्बल ५५० मुतखडे

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – मुतखडा म्हटलं किंवा त्याच्यापासून होणाऱ्या वेदनेचा नुसता विचार जरी केला तरी अंगवार काटा उभा राहतो. कितीही मजबूत माणूस असला तरी तो मुतखड्याच्या वेदना होताना अक्षरश: आडवा होत असतो. परंतु आता एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या शरीरातील तब्बल ५५० मुतखडे डाॅक्टरांनी बाहेर काढले आहेत. वेदनारहित शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हे खडे बाहेर काढण्यात डाॅक्टरांना यश आले आहे.

सदर ७५ वर्षीय वृद्ध व्यक्ती उजव्या मूत्रपिंडात आणि मूत्रमार्गात मूतखडे झाल्याने वेदनेने विव्हळत होते. या वेदनेने विव्हळणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या मुत्राशयातील तब्बल ५५० मुतखडे एसआरव्ही ममता रुग्णालयातील कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. लोकेश सिन्हा यांनी मिनिमल इन्व्हेसिव्ह होल सर्जरीद्वारे बाहेर काढले आहेत.

ओटीपोटात तीव्र वेदना होत असलेले ७५ वर्षीय रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या काही तपासण्या आणि अल्ट्रासाउंड चाचणी करण्यात आली. यानंतर त्यांच्या उजव्या मूत्रपिंडात मुतखडे असल्याचे निदान झाले. यावर उपचार करून हे खडे बाहेर काढण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. परंतु राठोड यांचे वय खूपच होते. त्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करता होल सर्जरी तंत्राचा वापर करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या उजव्या मूत्रपिंडात आणि मूत्रमार्गात ५५० मुतखडे आढळून आले. दीड तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ह्याही बातम्या वाचा –

Video Viral : जॅकलीनचा बेली डान्स चाहत्यांना करतोय घायाळ

*#Loksabha Election 2019 : लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसची २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर कोण आहेत ते २१ उमेदवार वाचा सविस्तर

नागपुरात ठरले : नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले

गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार गजाआड

सोशल मीडियावरील आचारसंहितेचा पुढाऱ्यांनी घेतला धसका