ग्रामीण पोलीस दलातील 6 जण पोलीस उपनिरीक्षकपदी

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्य लोकसेवा आयोगातर्फे सन२०१७ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील ६ पोलीस अंमलदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २४ डिसेंबर २०१७ मध्ये ३२२ जागांसाठी पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती यासाठी राज्यभरातून ४५५९ पोलीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४५१ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र झाले होते या परीक्षेचा नुकताच गुणवत्तेनुसार निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहा पोलीस अंमलदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेली आहे त्यात

१) उमाकांत गोपीनाथ कुंजीर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण

२) राहुल बाळासाहेब भागवत शिरूर पोलीस स्टेशन

३) सूर्यकांत राजाराम ओंबासे वेल्हा पोलिस स्टेशन

४) शरद बिरजू लोहकरे वडगाव मावळ महामार्ग पोलीस

५) अविनाश दराडे बारामती पोलीस स्टेशन,६)नाथा बबन गळवे बारामती पोलीस स्टेशन हे उत्तीर्ण झालेले आहेत.