खुशखबर ! ‘स्टाफ सिलेक्शन’द्वारे 6506 जागांसाठी भरती, युवकांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२० च्या माध्यमातून ६ हजार ५०६ जागांच्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. बेरोजगार आणि नुकतेच ग्रॅज्युएशन संपवून सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया ‘ब’ गट आणि ‘क’ गटांच्या पदांसाठी असणार आहे.

गट ब
>> सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर)
>> सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर)
>> सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर)
>> सहायक (असिस्टंट)
>> आयकर निरीक्षक
>> निरीक्षक
>> सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर)
>> सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट)
>> विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट)
>>उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)
>> कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

गट क
>> लेखा परीक्षक (ऑडिटर)
>> लेखापाल (अकाउंटंट)
>> कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट)
>> वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
>> कर सहाय्यक
>> उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर)

शिक्षणाची अट
>> कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवीधर.

>> उर्वरित पदे – कोणत्याही शाखेतील पदवीधर.

>> परीक्षा शुल्क – सर्वसाधारण/ इतर मागासवर्ग : १०० /- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही)

परीक्षेचे वेळापत्रक –
Tier-I : २९ मे ते ७ जून २०२१
Tier-II : नंतर सूचित करण्यात येईल

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत : ३१ जानेवारी २०२१

सविस्तर माहितीसाठी लिंक : https://bit.ly/3ilEB2a

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : http://ssc.nic.in