लिफ्टमध्ये अडकून ६ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

वसई : पोलीसनामा ऑनलाईन – इमारतीच्या सातव्या मजल्यावरील लिफ्टमध्ये अडकून ६ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वसई पूर्व येथे घडली आहे. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरारत हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलाचे नाव अद्याप समजू शकले नाही.

वसई पूर्व येथील सातिवली येथील डायस सेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच वालिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले. मृत मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
या घटनेमुळे इमारतीमधील असलेल्या लिफ्टच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित होत आहे. लिफ्टची वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभाल होत होती का  तसेच लिफ्टमध्ये मुलगा कसा आडकला याचा देखील शोध घेण्यात आला आहे.

खूनातील आरोपी जेरबंद
ठाणे: कळवा येथील एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला विश्वनाथ यादव हा कोल्हापूर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो अभिवचन रजेवर (पेरोल) कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून फरार झाला होता. त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने पुन्हा अटक केली.विश्वनाथ यादव याला कळवा पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती. त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याला २६ एप्रिल २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर त्याची कोल्हापूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. ही शिक्षा भोगत असतांना कारागृह प्रशासनाकडून अभिवचन रजा मिळवून तो बाहेर आला होता. तिथून बाहेर पडतांना नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी असा पत्ता त्याने कारागृह प्रशास

You might also like