जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान

नरसीफाटा : पाेलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

जगद्गुरु नरेंद्रचायजी महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थानतर्फे दि.२ऑक्टोबर रोजी नायगाव तालुक्यातील नरसी व कुंटुर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन नायगाव तालुका  श्री संप्रदाय सेवा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते यात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1acac19-c729-11e8-8608-d77fbf09043d’]

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील भिलवंडे, माधवराव कंधारे, सुहास पाटील टाकळीकर , अवकाश पा. धुप्पेकर,  नरसीचे चरअमण मारोतराव भिलवंडे, तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब पा जांभळे, शिवराज पाटील, पत्रकार  माधवराव पा चव्हाण, गंगाधर पाटील धुप्पेकर, मेडेवार सावकार, शिवाजी पा शिंदे, आनंदराव डाकोरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी गोळवलकर गुरुजी व जीवन आधार ब्लड बॅंकेच्या वातीने संयोजक मंडळांचा गौरव प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.  सध्या महाराष्ट्रात रक्ताचा मोठा  तुटवडा असल्यामुळे जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.२ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी एकाच वेळी राज्यातील २९३ केंद्रावर रक्त संकलन करण्यात आले होते. तर नांदेड जिल्ह्यातील दहा  केंद्रात रक्त संकलन करण्यात आले होते यात ५७० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये संस्थानतर्फे जगद्गुरु नरेंद्राजार्यजी महाराज यांच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त लष्करातील जवानांसाठी व शासकीय रक्त पिढीसाठी ६५ हजार बाटल्या रक्त संकलित करून शासनाला दान करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b746ffcb-c729-11e8-b7c3-cd690af4970b’]

दि. २ ऑक्टोबर रोजी संकलित केलेल्या रक्ताच्या बाटल्या ही  शासकीय रुग्णालयातील गरजू व गोरगरीब रुग्णांना दिले जाणार असल्याचे सांगितले. नायगाव तालुक्यातील नरसी व कुंटुर येथे रक्त संकलित करण्यासाठी नांदेड दक्षिण  जिल्हा अध्यक्ष राजू पानकर जिल्हा निरीक्षक नामदेव किवळेकर, सचिव काळे, डाॅ.दर्शनाताई राठोड, गंगाधर कोकणे,जि.आ.उ.प्र. अशोक चरकुलवार, दत्तात्रेय सिलेवाड, नागेश पाचांळ, नायगाव ता.अध्यक्ष शेषेराव कंधारे, सुधाकर साखरे, साहेबराव शेळके, कानगुलेसर,कैलास गचपशेटवार,कापावार,पवारेसर, पपुलवार, डाकेताई, भिलवंडे ताई,माधव भुयारे, श्रीपती साखरे,चिखलेसर, संगेवार , पवनकुमार पुटेवाड, हणमंत हणमंते, बोयाळ तालुक्यातील गुरुबंधू गुरुभगिनी परिश्रम घेतले.

नगर परिषदचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल