दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरत 11 KV लाईटच्या पोलवर चढला 60 वर्षीय माणूस; व्हिडीओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राजस्थानच्या धोलपूर जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. जिथे पाच मुलांचे वडील, ६०वर्षीय वयस्कर जे आजोबा झाले आहेत त्यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ११ हजार होल्टेज पॉवर लाईनच्या खांबावर काढले. असे म्हंटले जात आहे की, त्यांना पुन्हा लग्न करायचे आहे. असे म्हणून ते आपल्या कुटुंबावर आणि मुलांवर दबाव आणत होते.

या प्रकरणच बातमी वृद्धाच्या कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. जेव्हा हे वृद्ध खांबावर चढले त्यावेळी त्यामध्ये कोणताही करंट नव्हता, त्यामुळे मोठे संकट टळले आहे. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी माढा भाऊ वीज केंद्राकडे दिली. वीज विभागाने तात्काळ येऊन कनेक्शन तोडले.

कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना समजल्यानंतर वडील खाली आले. त्यावेळी लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. ही घटना रविवारी घडल्याचे सांगितले जात आहे. चार वर्षापूर्वी वृद्धाच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. पाचही मुलांची लग्न झालेली आहेत. त्यांना नातवंडे आहेत. असे असूनही दुसरे लग्न करण्याच्या आग्रहावरून ते खांबावर काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चार वर्षांपूर्वी सोबरन सिंह त्यांच्या पत्नीचे निधन झाले. बरेच दिवस त्यांनी दुसर्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला. मुले त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला तयार नव्हते आणि त्यांनी निषेध करण्यास सुरवात केली. पण रविवारी, ७ मार्च रोजी वृद्धाने पुन्हा आपल्या मुलावर आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी लग्न करण्यासाठी दबाव आणण्याला सुरवात केली. कुटुंबाने नकार दिला आणि भांडण सुरु झाले. म्हणून रागाच्या भरात ते आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेरील शेतात ११ केव्हीच्या हाय टेन्शन लाईनच्या विद्युत खांबावर काढले.

या प्रकरणात मानिया पोलीस स्टेशनचे एसएचओ सुमन कुमार यांनी सांगितले की, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहितीनुसार असे आढळले की, रविवारी ६० वर्षीय व्यक्तीने दुसऱ्या लग्नासाठी आपल्या मुलांवर राग केला आणि खांबावर चढले. त्यानंतर ग्रामस्थांनी माथा भाऊ विद्युत उपकेंद्रात फोन करून पुरवठा तोडला. नंतर वृद्ध खांबावरून खाली उतरले. वृद्ध व्यक्तींना तीन मुले आणि दोन मुली आहेत. नातवंडे आहेत तरी ते दुसऱ्या लग्नासाठी हट्ट करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे ते खांबावर काढले.