‘ALL THE RAJNEE FANS’ चा 2.0 प्रदर्शनापूर्वीच कल्ला

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक दिवसापासून चर्चेत असलेला 2.0 हा चित्रपट उद्या म्हणजेच २९ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी रजनीकांतचे चाहते उतावीळ आहेत. त्यातच एक उदाहरण म्हणजे रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून मुंबईतील  माटुंगा परिसरातील अरोरा चित्रपटगृहाबाहेर रजनीकांत यांचे ६८ फूट उंच एवढे कटआऊट इथे लावण्यात येणार आहे. यापूर्वी ‘कबाली’, ‘काला’ या चित्रपटांच्यावेळीही येथे उभारण्यात आलेल्या ६७ फूट उंच कटआऊटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळेच  या  चित्रपटगृहाबाहेर उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
रजनीकांतच्या चाहत्यांसाठी त्यांचे चित्रपट कोणत्या सणापेक्षा कमी नसतो म्हणूनच २९ तारखेला चित्रपट प्रदर्शित होत आहे म्हटल्यावर येथे पहाटे चार वाजता पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. पूजा पार पडल्यानंतर सकाळी सहा वाजता 2.0 चा पहिला शो इथे दाखवण्यात येणार आहे. अर्थात रजनीकांत यांच्या चाहत्यांची फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी तूफान गर्दी जमणार आहे हे नक्की. यापूर्वीही कबाली आणि कालाचे शो पहाटे ठेवण्यात आले होते.

2.0 हा बिग बजेट चित्रपट असून भारतातील पहिला आणि आशिया खंडातील दुसरा मोठा चित्रपट आहे. एस शंकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जगभरातील १० हजारांहून अधिक स्क्रिनवर तामिळ, इंग्रजी, हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

2.0 च्या विरोधात मोबाइल कंपन्या संघटित प्रदर्शनापूर्वीच 2.0 वादात अडकला