आज साजरा करण्यात आला 72 वा सेना दिवस, जाणून घ्या कोणत्या सैन्य अधिकार्‍याला करण्यात आला ‘समर्पित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज 15 जानेवारीला 72 वा सेना दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, वायूसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. भदौरिया, नौसेना प्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन देशासाठी आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

सेना दिवस भारतीय सैन्याचे पहिले कमांडर इन चीफ फिल्ड मार्शल एम. करियप्पा यांच्या आठवणीत साजरा करण्यात येतो. 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शन एम. करियप्पा यांनी ब्रिटिश भारतीय सेनेचे अखेरचे कमांडर इन चीफ सर फ्रांसिस बुचर यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. या वर्षीचा सेना दिवस यासाठी विशेष आहे कारण पहिल्यांदाच असे होत आहे की जेव्हा एक महिला कॅप्टन तान्या शेरगिल सेना दिवशी सहभागी होणार आहे, ज्या पुरुषांच्या गटाचे नेतृत्व करतील.

सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे सेना दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात म्हणाले की जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्दबातल ठरवून कलम 370 काढणे हा ऐतिहासिक निर्णय होता. ते म्हणाले की केंद्र सरकारच्या या निर्णयाने पश्चिमकडील शेजारी देशांद्वारे सुरु असलेल्या प्राॅक्सी वॉरवर परिणाम होत आहे.

त्यांनी करिअप्पा ग्राउंडमध्ये आयोजित परेड दरम्यान सांगितले की आमचे दहशतवादाप्रती झिरो टॉलरंन्सचे धोरण आहे. जनरल नरवणे म्हणाले की दहशतवादाला प्रोस्ताहन देणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत आणि तशी कारवाई करताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/