7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळेल भेट ! DA मध्ये होईल 20 हजार पर्यंत वाढ, जाणून घ्या पूर्ण गणित

नवी दिल्ली : 7th Pay Commission | नवीन वर्षापूर्वीच केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्त्या वाढवून मिळाला आहे. आता सरकार निवृत्त केंद्रीय कर्मचार्‍यांना (retired central government employees) नवीन वर्षाची भेट देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांच्या (pensioners) पेन्शनमधील महागाई भत्ता (DA) वाढवण्याची तयारी सुरू आहे. अशा स्थितीत पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते. नवीन वर्षात पेन्शनधारकांना किती वाढीव पेन्शन मिळू शकते हे जाणून घेऊयात… (7th Pay Commission)

 

DA आणि पेन्शनमध्ये होईल इतकी वाढ –

तज्ज्ञांच्या मते, सरकार जानेवारी 2022 पूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीए आणि पेन्शनमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करू शकते. यानंतर पेन्शनधारकांचा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के होईल.

 

त्यानंतर 68 लाख कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारकांच्या पगारात सुमारे 20 हजार रुपयांची वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, जर DA 34 टक्के असेल, तर 18,000 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचार्‍याचा DA वार्षिक 6,480 रुपये असेल आणि 56,000 रुपयांच्या पगारासाठी, DA वार्षिक 20,484 रुपये असेल. (7th Pay Commission)

 

फिटमेंट फॅक्टर वाढल्याने 6 हजार रुपये आणखी वाढतील –

महागाई भत्त्यात (DA) वाढ झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या पगारात किमान 20,000 रुपयांची वाढ होईल. त्याचवेळी फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ केल्यास पगारात 26 हजार रुपयांची वाढ होईल. फिटमेंट फॅक्टर हा सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचा मूळ पगार आहे. ज्यामध्ये सरकारने शेवटची 2016 मध्ये वाढ केली होती.

 

ज्यामध्ये कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले.
त्यामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मूळ वेतनाच्या समान वाढीमुळे महागाई भत्ता सुद्धा आपोआप वाढेल.

 

कशावर अवलंबून आहे DA –

सप्टेंबर 2021 पर्यंत AICPI डेटानुसार, डीए 32.81 टक्के होता
आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर तसेच डिसेंबरच्या आकडेवारीसाठी गणना करणे बाकी आहे.
डिसेंबर 2021 पर्यंत सीपीआयचा आकडा 125 वर आला तर. त्यामुळे डीएमध्ये 3 टक्के वाढ निश्चित आहे.
ज्याचे पेमेंट जानेवारी 2022 पासून सुरू होईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central employees will get a gift on the new year there will be an increase of 20 thousand in da understand the complete maths pensioners also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा