Pune Crime | पुण्यात लाकडाचे तुकडे रस्त्यावर पडल्याने अपघात, मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेट्रो स्टेशनचे (Metro station) काम करताना हलगर्जीपणा केल्याने लाकडाचे तुकडे रस्यावर पडल्याने झालेल्या अपघातात (accident) एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड परिसरात घडली. ही घटना सोमवारी (दि.20) सकाळी नऊच्या सुमारास नाशिक फाटा मेट्रो स्टेशन (Nashik Phata Metro Station) येथे घडली. या घटनेला मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराच्या जबाबदार व्यक्तींवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

अमोल फकिरा कदम Amol Faqira Kadam (वय-40 रा. अभिमान होम्स, शिरगाव, ता. मावळ) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अमोल कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) फिर्याद दिली असून पोलिसांनी मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणाऱ्या संबंधीत कंत्राटदार कंपनीच्या जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात नाशिक फाटा येथे स्टेशनचे काम सुरु आहे.
अमोल कदम आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरुन नाशिक फाटा रस्त्याने जात होते.
त्यावेळी मेट्रो स्टेशनच्या कामावरुन पडलेला लाकडाचा तुकडा त्यांच्या डोक्यात पडला.
अमोल यांनी हेल्मेट घातलेले असल्याने गंभीर दुखापत झाली नाही.
परंतु सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबद्दल मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे (API Kalyan Ghadge) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Accident due to falling pieces of wood on the road in Pune, FIR against Pune Metro contractor company

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा