7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

नवी दिल्ली : 7th Pay Commission | 1 कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी (Pensioner) आणखी एक चांगली बातमी आहे. सरकारने याच महिन्यात त्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढीची घोषणा केली होती, जो डिसेंबर 2020 पर्यंतच्या आकड्यांवर बेस्ड आहे. आता जून 2021 च्या महागाई भत्त्याचे (7th Pay Commission) आकडे सुद्धा Labor ministry ने जारी केले आहेत. यामध्ये कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 28 टक्केपेक्षा सुद्धा जास्त वर गेला आहे.

Labor Ministry नुसार जून 2021 मध्ये All India Consumer Price Index for Industrial Workers (AI CPI-IW) 1.1 अंकाची वाढ झाली आहे. यामुळे तो वाढून 121.7 वर पोहचला आहे. यामुळे त्यांचा DA आता 28 टक्केने वाढून 31 टक्के होईल. याचा थेट फायदा कर्मचार्‍यांना दिवसाळीच्या जवळपास होईल. सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये याची घोषणा करू शकते.

3 टक्के महागाई भत्ता वाढण्याचा अर्थ

ऑल इंडिया ऑडिट अँड अकाउंट्स असोसिएशनचे असिस्टंट सेक्रेटरी जनरल एच. एस. तिवारी
यांनी म्हटले की, जर एखाद्या कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 30 हजार रुपये महिना आहे तर त्याचा
पगार 900 रुपया महिना वाढेल.

1 वर्षात पाहिले तर ही वाढ 10800 रुपये महिना होईल. तर कॅबिनेट सचिव स्तरावरील
अधिकार्‍याची सॅलरी 7500 रुपये महिना वाढेल, ज्यांची बेसिक सॅलरी सर्वात जास्त अडीच लाख
रुपये महिना असते. आर्थिक आधारावर पाहिले तर ही वाढ 90 हजार रुपये महिना पर्यंत होईल.

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

Male Fertility | पुरुषांमध्ये कमी होतोय ‘प्रजनन’ दर, संशोधनात पर्यावरणातील ‘विषारी’ घटकांना मानलं जातंय जबाबदार; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  7th Pay Commission | 7th pay commission news central govt employees change in monthly gross basic salary dearness allowance dearness relief latest updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update