7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांना मिळू शकते नवीन वर्षात मोठी भेट! सरकार पुन्हा DA मध्ये करू शकते वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (central government employees) नवीन वर्ष बंपर भेटीचे वर्ष ठरू शकते. डियरनेस अलाऊन्स (DA), डियरनेस रिलीफ (DR), ट्रॅव्हलिंग अलाऊन्स (TA) आणि हाऊस रेंटल अलाऊन्स (HRA) मध्ये अलिकडेच वाढ केल्यानंतर 2022 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. (7th Pay Commission)

 

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांना जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्त्यात आणखी एक तीन टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे. अलिकडच्या डीए वाढीसह या कर्मचार्‍यांच्या वेतनात मोठी वाढ होईल.

 

एका हिंदी दैनिकाच्या वृत्तानुसार, डीए वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतनात सुमारे 20,000 रुपयांची वाढ होईल. मात्र, महागाई भत्त्यात वाढीबाबत सरकारकडून अधिकृतपणे काहीही घोषित करण्यात आलेली नाही. (7th Pay Commission)

 

महागाई भत्त्याशिवाय केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. रिपोर्टनुसार, केंद्र फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर विचार करत आहे. फिटमेंट फॅक्टर वाढला तर कर्मचार्‍यांची सॅलरी आपोआप वाढेल.

 

2016 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता.
त्यावेळी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन थेट 6000 रुपयांनी वाढवून 18,000 रुपये करण्यात आले होते.
याच्या वाढीमुळे किमान वेतनात वाढ होऊ शकते.

 

केंद्रीय कर्मचार्‍यांना आता 31 टक्केच्या हिशेबाने डीए मिळत आहे.
जुलै आणि ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA) दोन वेळा वाढ करण्यात आली आहे.
जुलैमध्ये अगोदर 28 टक्के वाढ करण्यात आली आणि नंतर तीन टक्के वाढवून तो 31 टक्के करण्यात आला.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission these employees may get big new year gift as union government may increase three percent da

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | अखेर ओमायक्रॉनचा धारावीत शिरकाव, आरोग्य यंत्रणा सतर्क; मौलवीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

DPDC Meeting Pune | पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय ! 793 कोटी 86 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता (व्हिडीओ)

Malaika Arora | 48 व्या वर्षी लेपर्ड प्रिंट ब्रालेट-स्कर्ट परिधान करुन मलायकाने वाढवला इंटरनेटवर पारा, चाहते म्हणाले – ‘वय होत चाललंय…’