7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA मध्ये झाली वाढ, जाणून घ्या कोण-कोणत्या राज्यात कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल वाढ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance- DA) आणि महागाई मदत (DR) जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच वाढवण्याची घोषणा (7th Pay Commission) केली आहे. याशिवाय सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढवला आहे.

हा 1 जुलैपासून लागू होईल म्हणजे जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचार्‍यांना डबल फायदा मिळू शकतो. या पावलामुळे केंद्र सरकारचे सुमारे 48.34 लाख कर्मचारी तसेच 65.26 लाख पेन्शनधारकांना लाभ होईल. केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत आता इतर राज्यांनी सुद्धा महागाई भत्ता वाढवला आहे.

जाणून घ्या किती मिळेल DA ?

तुमची सॅलरी किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमची बेसिक सॅलरी चेक करावी लागेल. सोबतच आपला सध्याचा DA तपासा. सध्या तो 17 टक्के आहे जो DA दिल्यानंतर 28% टक्केपर्यंत जाईल. यामुळे मासिक DA 11% वाढेल. यासाठी, केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा डीए 1 जुलै 2021 पासून त्यांच्या मुळ वेतनाच्या 11% पर्यंत वाढेल.

केंद्राप्रमाणेच उत्तर प्रदेश सरकारने महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केल्याने येथील सरकारी कर्मचार्‍यांना 28 टक्केच्या वाढीव दराने महागाई भत्ता मिळू शकतो.
जम्मू काश्मीर 17 टक्केवरून वाढून 28 टक्के केला आहे. येथे महागाई भत्ता 1 जुलैपासून मिळू शकतो.

झारखंड सरकारने सुद्धा डीए 17 टक्के वाढवला आहे.
कर्नाटक सरकारने महागाई भत्ता जानेवारी 2020 ते जून 2021 च्या कालावधीसाठी सध्याच्या 11.25 टक्केवरून 21.5 टक्के केला आहे.
राजस्थान आणि हरियाणा सरकारने सुद्धा 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : 7th pay commission govt employees will get 28 percent da in these state know check list here

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’

Lalbaugcha Raja  | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट!
भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

Pregnancy | प्रेग्नंसीत ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने मुल गोरे होते का? या काळात सेक्स करावा का?
जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट