7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! सप्टेंबरमध्ये होईल ‘डबल’ फायदा, इतका वाढेल महिन्याचा पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) 17 टक्क्यावरून वाढवून 28 टक्के (7th Pay Commission) केला आहे. सोबत हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) मध्ये सुद्धा वाढ केली आहे. नवी डीए आणि डीआरच्या हिशेबाने त्यांचा पगार पुढील महिन्यात सप्टेंबरपासून वाढून खात्यात येऊ लागेल. म्हणजे केंद्रीय कर्मचार्‍यांची सप्टेंबरची सॅलरी आता डबल बोनांझासह येईल.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता 1 जुलैपासून वाढवून 28 टक्के केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये 11 टक्केची वाढ मंजूर केली होती.
ज्यामुळे केंद्र सरकारचे 48 लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि 65 लाख पेंशनधारकांना फायदा झाला होता. आता DA चा नवीन दर 17 टक्केवरून वाढून 28 टक्के झाला आहे.

महागाई भत्त्याशिवाय (DA) हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढला

केंद्र सरकारने डिए (DA) वाढल्यानंतर केंद्रीय कमर्चर्‍यांना मिळणारे हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढवला आहे.
सरकारने HRA ला वाढवून 27 टक्केपर्यंत केला आहे.
महागाई भत्त्यानंतर आता हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) वाढल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांना लाभ झाला आहे.

एचआरएमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी 1-3 टक्केची वाढ करण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या शहराच्या हिशेबाने 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के हाऊस रेंट अलाऊन्स मिळेल.
सध्या तीन क्लाससाठी 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के आहे.

28 टक्के महागाई भत्त्याचे कॅलक्युलेशन

नवीन महागाई भत्ता (टक्के) – 5,040 रुपये प्रति महिना

आतापर्यंतचा महागाई भत्ता (17 टक्के)- 3,060 रुपये प्रति महिना

किती वाढला महागाई भत्ता – 1980 रुपये वाढला

वार्षिक वेतनात प्रति महिना – 1980×12 = 23760 रुपये

 

AICPI चा जून 2021 मध्ये आकड़ा 121.7 वर पोहचला आहे.
यामध्ये 1.1 अंकाची वाढ झाली आहे. अशाप्रकारे एकुण डीए 31.18 टक्के होतो.
परंतु, डीएचे पेमेंट राऊंड फिगरमध्ये होते. यामुळे डिए 31 टक्के मिळेल.
आता पुन्हा 3 टक्के वाढीनंतर महागाई भत्ता 31 टक्केच्या स्तरावर पोहचेल.
म्हणजे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा एकदा मोठी वाढ होईल.

 

Web Title : 7th pay commission latest news updates central government employees will get salary hike september da and hra cpc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MNS MLA Raju Patil | म्हाडा सोडतीत कथित गैरव्यवहार प्रकरणात मनसे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात फौजदारी दावा

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढला; रत्नागिरी, जळगावमध्ये सर्वाधिक रुग्ण

Pune Corporation Amenity Space | राष्ट्रवादीच्या माघारी मुळे सत्ताधाऱ्यांनी अ‍ॅमिनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव ‘गुंडाळला’ !