8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगाची चर्चा; केंद्रीय कर्मचाऱ्यांची 44 टक्के पगार वाढीची मागणी

नवी दिल्ली: वृतसंस्था – केंद्रीय सरकारी कर्मचारी (Central Government Employees) संघटनामंध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) चर्चा आहेत. सातव्या वेतन आयोगात अनेक शिफारशी लागू न केल्याची अनेक संघटनांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांना आता आठव्या वेतन आयोगात पूर्तता करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या संघटना केंद्राला तसे पत्र देखील पाठविणार आहेत.

आठव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी निवेदन तयार करण्यात येत असून, ते लवकरच केंद्राला पाठविण्यात येणार आहे. यात शिफारशींनुसार पगार वाढवावा आणि आठवा वेतन आयोग अंमलात आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु केंद्र सरकारने यापूर्वीच लोकसभेत आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी चर्चा करण्यास नकार दिला आहे. सरकारने आठवा वेतन आयोगाबाबत कोणताही विचार करण्यास स्पष्ट नकार कळविला आहे. तरी देखील सरकार कर्मचाऱ्यांच्या निवेदनाची दखल घेईल, अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन 18000 रुपये आहे. आणि कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर
(Fitment Factor) 2.57 दिला जातो. तो वाढवून 3.68 करण्याची मागणी अलीकडेच करण्यात आली होती.
यावर सरकारने सहमती दर्शविल्यास कर्मचाऱ्याचे किमान वेतन 18000 वरुन 26000 होऊ शकते.
त्यामुळे आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) मागणी जोर धरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सरकार सातव्या वेतन आयोगानंतर कोणताही आयोग आणणार नाही.
त्याच्या बदल्यात शासन अशी योजना आणणार आहे, की ज्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होईल.
तसे झाल्यास 68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख पेन्शन धारकांना त्याचा फायदा होणार आहे.

Web Title :-  8th Pay Commission | 8th pay commission latest updates central employees want 44 percent salary hike will give proposal to government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anushka Sharma | अनुष्का शर्माने साडी नेसून चाहत्यांना घातली भुरळ, फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल

Shahrukh Khan | ‘त्या’ वक्तव्यावर शाहरुख खानने दिले स्पष्टीकरण; म्हणाला…