वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक पदक विजेता मेरी कोमसह 9 महिला बॉक्सर पुण्यात सुरू करणार ट्रेनिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहावेळा जागतिक चॅम्पियन आणि ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता बॉक्सर एमसी मेरी कोमसोबत टोकियो ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलेल्या दोन इतर बॉक्सर सिमरनजीत कौर (60 किग्रॅ) आणि लवलीना बोरगोहॅन (69 किग्रॅ) यांना लवकरच सुरू होणार्‍या एलिट महिला राष्ट्रीय शिबिरात सहभागी करण्यात आले आहे.

कोविड-19 महामारी पहाता, पुण्यात जास्त सुरक्षित वातावरणात पटियालाहून शिबिर शिफ्ट करण्याच्या निर्णयानंतर एकुण 10 महिला बॉक्सर येथे आर्मी स्पोर्ट इन्स्टीट्यूट (एएसआय) मध्ये पुन्हा ट्रेनिंग सुरू करतील. कॅम्प 31 जुलैपर्यंत चालणार आहे आणि यानंतर ऑलिम्पिकसाठी खेळाडू टोकियोला रवाना होतील.

राष्ट्रीय शिबिरात येणार्‍यांमध्ये 2019 जागतिक चॅम्पियनशिपचे कांस्यपदक विजेता जमुना बोरो (54 किग्रॅ) आणि पूजा राणी (75 किग्रॅ) यांचाही समावेश आहे.

याच्याशिवाय नुकतेच पोलंडमध्ये एआयबीए यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी राजस्थानची बॉक्सर अरुंधती चौधरी (69 किग्रॅ), मंजू रानी (48 किग्रॅ), सोनिया लाठर (57 किग्रॅ), लालबु आतसैही (64 किग्रॅ) आणि शशि चोपडा (64 किग्रॅ) यांना सहभागी करण्यात आले आहे.