बेरोजगारांना दर आठवड्याला 22 हजार तर गरजूंना मिळणार 44 हजार रुपये; US चं 900 अरब डॉलर्सचं कोरोना पॅकेज जाहीर

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला बसला आहे. जगभरातील सर्वच देशांची कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या देशांमध्ये अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मदतीची घोषणा केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेने कोरोना मदतनिधीची घोषणा केली आहे. अमेरिकेतील संसदेने ६६३ लाख कोटींचे म्हणजेच ९०० बिलियन डॉलर्सच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. या नवीन आर्थिक मदतीमुळे बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर (२२ हजार रुपये) आणि गरजूंना ६०० डॉलर (४४ हजार रुपये) मदत दिली जाणार आहे. यात सर्वाधिक फटका बसलेले उद्योग, शाळा आणि आरोग्य सेवांनाही या आर्थिक पॅकेजमधून मदत केली जाणार आहे.

जो बायडन यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. ते अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आहेत. एका महिन्यात आम्ही परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करु. याच कामासाठी बायडेन आता स्वत:ची टीम वाढवत आहेत. जो बायडन यांनी सत्ता हाती घेण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, बायडेन यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे, की “एका महिन्यात आम्ही सारं काही ठीक करण्यास सुरुवात करणार आहोत. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आम्ही जल आणि वायू प्रदुषणासंदर्भात जगातिक स्तरावर नेतृत्व करण्यास तयार आहे. करोना आर्थिक पॅकेज अमेरिकन नागरिकांना फायद्याचे ठरणार आहे.

मागील बऱ्याच काळापासून या आर्थिक मदतीसंदर्भात चर्चा सुरु होती. अमेरिकन काँग्रेसनेही या आर्थिक मदतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोनामध्ये सर्वात वाईट परिस्थिती झालेल्या समाजातील खालच्या थरातील व्यक्तींना मदत करणे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी निधी जाहीर करण्यासाठी बायडेन यांनी सहमती यापूर्वीच दर्शवली होती. अमेरिकेतील या आर्थिक पॅकेजमधून बेरोजगार, गरजूंना मदत केली जाणार आहे. या सर्व पात्र लोकांना आर्थिक भत्ते दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या निधीमधील काही भाग हा कोरोना लसीकरणासाठी वापरला जणार आहे. लसीकरण कशापद्धतीने करण्यात यावे यासंदर्भातील नियोजनापासून लस सर्व ठिकाणी पोहचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक कामांसाठी या निधीतील ठराविक भाग वापरला जाणार आहे. बायडेन यांनी ९०० अरब डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजसंदर्भात एकमत असल्याचं सांगितलं. या निधीचा वापर कोरोना काळामध्ये सर्वाधिक फटका बसलेले व्यापारी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी तसेच कोरोनाच्या लसीकरणासाठी केला जाणार आहेत.