डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानीला लगाम, डेमोक्रॅटिक पक्ष बळकट

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटसला बहुमत मिळाल्यामुळे यापुढे ट्रम्प यांच्या कारभारावर वचक ठेवता येणार आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून प्रतिनिधी सभागृहावर डेमोक्रॅटिक पक्षाने नियंत्रण मिळवले आहे. तर सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमधील बहुमत कायम राहिले आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर अमेरिकेत दोन वर्षांनी मध्यावधी निवडणुका होतात. ट्रम्प यांच्या एकतर्फी निर्णयांना लगाम घालण्याबरोबरच चौकशी करण्याचे अधिकार डेमोक्रॅटसना मिळाले आहेत.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 

२०१६ साली डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली त्यावेळी प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट या दोन्ही महत्वाच्या सभागृहांवर रिपब्लिकन्सचे वर्चस्व होते. सिनेटमधल्या १०० पैकी ५१ जागा रिपब्लिकन पक्षाने जिंकल्या असून ४५ जागा डेमोक्रॅटसला मिळाल्याचे वृत्त आहे. सिनेटचा निकाल हे मोठे यश आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. डेमोक्रॅटसला ट्रम्प यांच्या टॅक्स रिर्टनचा तपास करण्याचा अधिकार मिळाला आहे. व्यापारासह ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांसदर्भातील एकतर्फी निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार डेमोक्रॅटसना प्राप्त झाला आहे. या निकालामुळे आठ वर्षानंतर डेमोक्रॅटसना पहिल्यांदाच प्रतिनिधी सभागृहावर वर्चस्व मिळाले आहे.

भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार 

ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे स्थलांतरित विरोध, स्थानिकांना प्राधान्य या मुद्दांवरच निवडणूक लढवली होती. मागच्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रम्प यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजवटीतील अनेक निर्णय ट्रम्प यांनी बदलले आहेत.