क्रिडा क्षेत्रात करियर घडविता येऊ शकते, नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे मत

पुणे- सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, कायमस्वरूपी नोकरी अश्या संकल्पना आता मागे पडत असून आजचा युवक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करीत आहे , क्रिडा क्षेत्रात ही युवक चांगले नाव , प्रतिष्ठा कमावत आहे , आजच्या काळात क्रिडा क्षेत्रात ही करियर घडविता येऊ शकते यासाठी युवकांनी कठीण परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असे प्रतिपादन पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ,नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी केले .

माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल विधाते सोशल फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्र.९ यांच्या द्वारे आयोजित हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे ( भाईजी चषक ) बक्षिस वितरण बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते झाले , यावेळी ते बोलत होते . भाईजी चषक हा सनी बालवडकर स्पोर्ट्स क्लबने पटकावला तर शिवम बालवडकर स्पोर्ट्स क्लब उपविजेता ठरला , तृतीय क्रमांक राजाभाऊ लोखंडे मित्र परिवार यांनी पटकावला , बाणेर येथील स्व. सुधीर यशवंत विधाते क्रिडा नगरी,विधाते वस्ती येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .

या कार्यक्रमास बाबुराव विधाते , देविदास मुरकुटे , राजेंद्र मुरकुटे , विजय विधाते , तुकाराम विधाते , विश्वास मुरकुटे , नितीन कळमकर , शेखर सायकर , माणिक गांधिले , सुनील विधाते , प्रल्हाद मुरकुटे , नंदकुमार विधाते , भगवान विधाते , अर्जुन शिंदे , अर्जुन ननावरे , जंगल रणावरे , संतोष विधाते ,रामदास धनकुडे , राजाभाऊ कळमकर , समीर चांदेरे ,प्राजक्ता ताम्हाणे , सुषमा ताम्हाणे ,जितेंद्र विधाते , विशाल विधाते सोशल फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते .