दांडिया खेळणाऱ्या महिलांचे व्हिडिओ अन् उठल्या लाठ्या-काठ्या आणि तलवारी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – दांडिया खेळणाऱ्या महिलांचे चित्रीकरण करण्याच्या वादावरून दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली. सदर प्रकार १८ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोकुळनगर येथील दुर्गोत्सव मंडळाजवळ घडला. या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

विट्यात भोंदूबाबाने दिली दहा लाखांची वीट…

मिळालेल्या महतीनुसार, गोकुळनगर येथील दुर्गोत्सव मंडळाजवळ महिलांचा दांडिया सुरु होता़ यावेळी शेजारील इमारतीवरुन काही जण या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते. याबाबत अजय नागनाथ गोपीवाड यांनी त्यांना जाब विचारला असता चित्रीकरण करणाऱ्या करणाऱ्या लोकांनी अजय गोपीवाड यांच्यावर हल्ला केला. तोच वाद पुढे वाढत जाऊन दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली.

बंडू सोनसकर, व्यंकट मुदीराज, खदीर, गोपी मुदिराज, रोहित मुदीराज, राज मुदिराज, शेख बबूल वजीर शेख, करण रमेश वाघमारे व इतर १० ते १५ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमा करीत लाठ्या-काठ्या अन् तलवारीने हल्ला केला़ या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी या प्रकरणाचा तपास पोउपनिरिक्षक कांबळे हे करीत आहेत.

परस्पर विरोधी तक्रार
तसेच याच प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे़. व्यंकट मुदिराज हे आपल्या इतर मित्रांसह इमारतीच्या छतावर काम करीत असताना आरोपी अजय गोपीवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्याला चार ते पाच वेळेस फोन केला. त्यानंतर फोन का उचलला नाही असे म्हणून वाद घालत मारहाण केली. या प्रकरणी अजय गोपीवाड, रवी गोपीवाड, कृष्णा गोपीवाड, साई दिनकर पाटील, राहुल उचलवार, नरेश भारकाला, विठ्ठल गोपीवाड यांच्यासह इतर ५ ते १० जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनिरिक्षक भोसले या करीत आहेत.

जाहिरात