नाल्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेला मित्रही गेला वाहून 

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन 

गेले तीन चार दिवस डोंबिवली शहरात मुसळधार पाऊस होत असल्याने नाले ओसंडून वाहत आहेत. पूर्व डोंबिवली येथील नांदिवलीमधील नाल्याच्या पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्रासह दोघेजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१०) रात्री नऊच्या सुमारास घडली.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19374273-8506-11e8-ae7e-5beef709a73a’]

या घटने बद्दल मिळालेली माहिती अशी कि हर्षद आणि त्याचा मित्र नांदिवली परिसरातून जात होते. त्याच रस्त्यावर असलेला नाला पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेला होता. तो नाला हर्षदला दिसला नसल्याने तो नाल्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्राने त्या नाल्यात उडी मारली परंतु वाहत येणाऱ्या पाण्याचा वेग इतका होता कि तो हि त्या नाल्यात वाहून गेला.

हि घटना कळताच केडीएमसिच्या अगनीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहून गेलेल्या तरुणांचा शोध घेतला. वाहून गेलेल्या दोघाही तरुणांचा रात्री उशिरा पर्यंत काही शोध लागला नव्हता. तेथे असलेल्या स्थानिक लोकांनी या घटने संधर्भात अग्निशमन दलाच्या जवानांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप केला आहे.
[amazon_link asins=’B00ROP1JXQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ae3b6f8-8506-11e8-9354-95f383549e6a’]