ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु असतानाच भीषण स्फोट; अमेरिकेतील नेशविल पर्यटनस्थळावरील घटना

नेशविल : कोरोनाची दहशत असतानाही नागरिक ख्रिसमसचा आनंद लुटत असताना अमेरिकेतील नेशविल येथे भयंकर स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात आजू बाजूला असलेल्या गाड्यांचा अक्षरश चुराडा झाला आहे. या स्फोटात तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या स्फोटाची माहिती देणार्‍याला एफबीआयने १० हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार कारमध्ये जाणीवपूर्वक हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. आतापर्यंत या स्फोटाची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.

हा स्फोट पाहणार्‍या एकाने फेसबुकवर या स्फोटाचे वर्णन केले आहे. त्याच्या मते, हा स्फोट इतका भयंकर होता की गाड्या हवेत उडाल्या आणि त्यांचा चुराडा झाला. तर झाडंदेखील उन्मळून पडली.

ख्रिसमस आणि सर्वसाधारणपणे ज्या परिसरात स्फोट घडला, तो भाग वर्दळीचा आणि पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. सुदैवाने इथे खूप वर्दळ नसल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.