माणुसकी ! प्लाझ्मा ‘डोनेट’ करण्यासाठी मुस्लिम युवकानं तोडला ‘रोजा’, म्हणाला – ‘कोणाचीही सेवा करणं सर्वात मोठं पुण्याचं काम’

पोलीसनामा ऑनलाइन – देशात वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये काही भागांमधून अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे आतपर्यंत थरारकता निर्माण झाली आहे. काही अशा घटना घडल्या आहेत, ज्या माणुसकीला लाजिरवाण्या ठरल्या आहेत. परंतू राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका व्यक्तीने असे कृत्य केले आहे की, त्यामुळे माणुसकी पुन्हा एकदा जागी झाली आहे.

बुधवारी उदयपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने उपवास तोडला आहे, कारण कोरोनाने संक्रमित असलेल्या दोन महिलांना प्लाझ्मा दान करता येऊ शकेल. या व्यक्तीचे नाव आहे अकील मन्सुरी. जे एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. अकील यांनी कोणताही संकोच न करता एका चांगल्या कामासाठी उपवास तोडला आहे.

या व्यक्तीने केलेल्या या कार्यामुळे सर्व ठिकाणी त्यांचे कौतुक केले जात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सोशल मीडिया नेटवर्किंग आणि ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून त्यांना या गोष्टीची बातमी मिळाली की कोविड संक्रमित असलेल्या दोन महिलांना प्लाझ्माची गरज आहे. या दोन्ही महिलांना A+ ब्लड ग्रुप प्लाझ्माची गरज आहे.

यामधील एका महिलेचे नाव निर्मला होते, त्याचे वय ३६ वर्ष आहे. तर दुसऱ्या महिलेचे वय ३० वर्ष आहे आणि त्यांचे नाव अल्का आहे. मन्सुरी म्हणाले की सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यानंतर ते रुग्णालयात गेले आणि प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. कोरोना या आजारातून बरे वाटल्यानंतर त्यांनी एकदा प्लाझ्मा दान केले आहे, त्यामुळे त्यांना याबद्दल आधीपासून माहिती होती.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टर मन्सुरी यांना ऍन्टीबॉडी टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर डॉक्टरांना समजले की ते प्लाझ्मा दान करण्यासाठी एकदम फिट आहेत. डॉक्टर म्हणाले की सकाळपासून उपवास असल्यामुळे तुम्ही प्लाझ्मा दान करण्याआधी काहीतरी खावे. म्हणून मी रोझा तोडला आणि रक्तदान केले.

मन्सुरी म्हणाले की एक माणूस म्ह्णून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडली आहे. मन्सुरी म्हणाले की, प्लाझ्मा दान केल्यानंतर त्यांनी दोन्ही महिलांच्या प्रकृतीसाठी त्वरित प्रार्थना केली. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनामधून बरे झाल्यापासून मन्सूरने कमीत कमी १७ वेळा रक्तदान केले आहे. मन्सुरी म्हणाले की, त्यांनी प्लाझ्मा तीन वेळा दान केले आहे आणि सर्व लोकांना गरजूंसाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.