वाळू माफीयांची नविन शक्कल… पावती एक आणि फेऱ्या डबल

नायगाव : पोलीसनामा ऑनलाईन – नायगाव तालुक्यात बिनधास्तपणे वाळू तस्करीला ऊत आला आहे. विशेष म्हणजे महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने ही तस्करी घडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे. तहसीलदारांनी वाळू माफियांवर केलेल्या कारवाईत ही बाब उघडकीस आली आहे.

अमृतसर दुर्घटना : ट्रेन ड्रायव्हरचा लेखी जबाब, ‘त्या’ रात्रीची पूर्ण कहाणी

नायगाव तालुक्यातील महससूल प्रशासनाच्या पाठबळावर वाळू माफीयांनी नविनच शक्कल लढवली आहे. लिलाव झालेल्या वाळूच्या एका पावती वर अवैधरित्या उत्खनन केलेली हजारो ब्रास वाळू दोन वेळा टिप्परमधून लातूर पर्यंत नेली जाते. वाळू वाहतूक सुरू असताना कुठेच या वाहनांची कोणीच चौकशी करत नसल्याने बिनधास्तपणे वाळू तस्करीला ऊत आला आहे. या कारणाने मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे.

नायगाव तालुक्यातील राहेर, हुस्सा, मेळगाव, सातेगांव, बळेगाव या ठिकाणचे रेती घाट मागील काळात लिलावाव्दारे सुटले होते. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने या ठिकाणाहून ठरवून दिलेल्या ब्रासपेक्षा अधिक हजारो ब्रास रेती अवैधरित्या उत्खनन करून या भागातील शेतात , मोकळ्या जागेत, गायरान जमिनीवर साठवण्यात आले होते. त्या साठविण्यात आलेल्या वाळूच्या साठ्यांना जप्त करून त्यांचे मोजमाप नायगाव तहसीलचे अधिकारी व कर्मचा-यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्या मार्फत मोजमाप करण्यात आले. पण रेती साठवणूकदार यांनी या दोन्ही विभागाच्या अधिका-यांना हाताशी धरून मोजमाप कमी केल्याची चर्चा होत आहे .

अमृतसर दुर्घटना  : बापाचा मृत्यू , अन्…बाळाचा पुर्नजन्म

जप्त केलेल्या काही ठिकाणच्या वाळूचा साठ्याचा लिलाव नायगाव तहसीलमध्ये झाला. त्या ठिकाणाहून रेती वाहतुक सुरू आहे. पण मोजमाप कमी दाखवण्यात आल्याने रेती जास्त तर पावत्या कमी आहेत .त्यामुळे रेती च्या वाहनाला सकाळी फक्त टिप्परचा नंबर टाकून सदर गाडी नागपुर , सोलापूर , कोल्हापूर ,सांगली , उस्मानाबाद आदी भागात जात असल्याचे नमुद करण्यात येत आहे . पण ही वाहने मुखेड , लातूर , जळकोट , नांदेड , नायगाव , देगलूर , अहमदपूर , जांब या परिसरात जात आहे .त्यामुळे एकाच रॉयल्टी पावतीवर दोन फे-या टिप्पर धारक मारत आहेत .त्यामुळे या बनवाबनवी मुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडत आहेत .

हा प्रकार गेल्या महिनाभरापासून वाढीस लागल्याचे समजताच लोहगाव फाट्यावर बिलोलीचे तहसीलदार राजपूत यांनी कर्मचाऱ्यांसह बेकायदेशीर रेती वाहतुक करणा-या अनेक वाहनांवर कारवाई केली तर अनेक वाहनधारकांना नियमाप्रमाणे दंड ठोठावला आहे. पण नायगाव तहसील प्रशासन या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत रेती तस्करांना पाठबळ देत वाहने तपासणी करणे तर सोडाच पण अवैध मार्गाने रेती उपसा करून जागोजागी रेती साठवलेल्या तस्करांना रान मोकळे करून दिले आहे. एकाच पावतीवर दोन फे-या मारणा-या वाहन धारकांना अर्थपुर्ण सहकार्य करण्यात धन्यता मानत आहे. तहसीलने नेमलेल्या पथकाचा ठाव ठिकाणा नसून कोणतीच चौकशी होत नसल्याने स्थानिक रेती तस्कर शासनाला न जुमानता मोठ्या प्रमाणात महसूल बुडवत बिनधास्तपणे हा गोरख धंदा स्व:ताच्या जबाबदारीवर लातूरच्या टिप्परांना आयात करून चालविला आहे.हा गैरप्रकार वरिष्ठ अधिकारी तरी थांबवतील का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहीरात