रात्री दोन वाजता ईमेल तपासण्यासाठी उठला व्यक्ती, 75 कोटींचे बक्षीस लागल्याचे पाहून उडाली झोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   ‘देने वाला जब भी देता हे, छप्पर फाड के देता हे ‘ हिंदीतील हे प्रसिद्ध वाक्य ऑस्ट्रलियाच्या व्यक्तीला तंतोतंत लागू होत. गुरुवारी हा व्यक्ती लवकर झोपी गेला. परंतु 2 वाजता त्याला अचानक जाग आली आणि त्याने सहज आपले ईमेल तपासण्यास सुरवात केली. परंतु त्याला अंदाज देखील नव्हता कि, तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे बक्षीस जिंकणार आहे. या व्यक्तीने पॉवरबॉल लॉटरीमध्ये 10 मिलियन डॉलर्सचा जॅकपॉट जिंकला आहे.

माहितीनुसार, ब्रिस्बेनच्या सँडगेटमध्ये राहणारी ही व्यक्ती काही काळापासून लॉटरीमध्ये गुंतवणूक करत आहे. जेव्हा त्या व्यक्तीला हे समजले की, त्याने पॉवरबॉलच्या 10 मिलियन डॉलर्सचे टॉप प्राईज जिंकले आणि त्याच्या विजयाची एकून रक्कम 75 कोटींच्या आसपास आहे. याबद्दल बोलताना त्या व्यक्तीने सांगितले की, मला वाटले की, मी 10,000 डॉलर्स जिंकले आहेत आणि मला याबद्दल खूप आनंद झाला. परंतु मला समजले की मी टॉपचे प्राईज जिंकले आहे. ज्याची रक्कम खूप जास्त आहे. या व्यक्तीने जिंकलेली एकूण रक्कम 1 कोटी डॉलर्स असून ती सुमारे 75 कोटी रुपये आहे.

या व्यक्तीने पुढे म्हटले की, माझे स्वतःचे काम आहे, तर मी या बक्षिसेनंतरही काम करत राहीन. मी माझ्या कुटुंबाला यापूर्वीही सांगितले आहे की मी मोठी लॉटरी जिंकली तरी मी काम करत राहील. मी हे न केल्यास मला कंटाळा येईल. दरम्यान, ही व्यक्ती आता त्याच्या पालकांसाठी आणि स्वतःसाठी घर मिळविण्याचा विचार करीत आहे. परंतु त्याला अजूनही वाट्ते की तो स्वप्न पाहत आहे. मागील वर्षी, 14 पॉवरबॉल डिविजन वनच्या विजेत्यांनी देशभरात 470 मिलियन डॉलर्स जिंकले.