कामाची गोष्ट ! बँक पासबुकद्वारे देखील अपडेट केलं जाईल तुमचं ‘आधार’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : यूनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आधार वापरकर्त्यांना विविध सुविधा पुरवतो. यूआयडीएआय हे कोणत्याही आधारात बदल, अपडेशन किंवा दुरुस्त करण्यास अनुमती देतो. परंतु, आधारमध्ये कोणतीही माहिती अद्ययावत करण्यासाठी वापरकर्त्यांना वैध कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. आधारमध्ये पत्ता बदलण्यासाठी यूआयडीएआय 44 इतर प्रकारचे कागदपत्रे देखील स्वीकारतो. या 44 कागदपत्रांपैकी एक म्हणजे बँक पासबुक. अशा परिस्थितीत, जर आपल्याला आपल्या आधारमधील पत्ता बदलायचा असेल तर आपले काम बँक पासबुकने देखील केले जाईल. आपला फोटो या बँकेच्या पासबुकमध्ये संलग्न असणे आवश्यक आहे आणि शिक्क्यासह बँक अधिकाऱ्याची सही असणे देखील आवश्यक आहे.

यूआयडीएआयने एका ट्वीटद्वारे आधार कार्डधारकांना याबाबत माहिती दिली आहे. यूआयडीएआयने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हालाही बँक पासबुकच्या मदतीने आधारमध्ये पत्ता अपडेट करायचा असेल तर प्रथम आपल्या बँकेच्या पासबुकमधील फोटोवर बँकेद्वारे शिक्का मारला गेला आहे आणि त्यावर स्वाक्षरी आहे का याची खात्री करा. त्याशिवाय बँक पासबुक वैध कागदपत्र मानलं जाणार नाही.’

इतर कोणत्या कागदपत्रांद्वारे आधार कार्डमधील पत्ता बदलता येतो?

पासपोर्ट, रेंट अ‍ॅग्रीमेंट, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, विजेचे बिल, पाणी बिल, मतदार ओळखपत्र यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील पत्ता बदलू शकतात. सर्व 44 कागदपत्रांची माहिती यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

आधारमध्ये ऑनलाइन पत्ता कसा अपडेट करावा

– प्रथम यूआयडीएआय वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. येथे आपल्याला My Adhaar म्हणून एक टॅब सापडेल. ड्रॉपडाऊनच्या दुसर्‍या टॅबवर Udate Your Aadhaar मध्ये जाऊन त्याच्या ड्रॉपडाउनमधील तिसरा पर्याय Update your address online वर क्लिक करा.

– त्यावर क्लिक केल्यास नवीन पृष्ठ उघडेल. येथे खाली गेल्यावर Proceed to Update Address वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल.

– या पृष्ठावर प्रथम आपला आधार क्रमांक, कॅप्चा व्हेरिफिकेशन प्रविष्ट करा आणि खाली Send OTP वर क्लिक करा. आता आपल्या आधार नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी येईल.

– त्या ओटीपीला प्रविष्ट करा. त्यात प्रवेश केल्यावर तुम्हाला Data Update Request वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अ‍ॅड्रेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पत्ता बदलला जाईल.