Aadhaar Card मध्ये पत्ता अपडेट करण्याची ही सुविधा UIDAI ने केली बंद, भाडेकरूंची समस्या वाढली; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card जारी करणार्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) Address Validation Letter च्याद्वारे आधार कार्डात अॅड्रेस अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. या सुविधेच्या वापराद्वारे असे आधार कार्ड होल्डर आपला अॅड्रेस अपडेट करू शकत होते, ज्यांच्याकडे पत्त्याचा कोणताही वैध पुरावा नाही. नोकरी आणि उद्योगानिमित्त बाहेर गावी राहणार्यांसाठी ही खुप महत्वाची सेवा होती.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
UIDAI च्या वेबसाइटवरून हटवले हे ऑपशन
दैनिक जागरणने जेव्हा ट्विटरच्या माध्यमातून UIDAI शी संपर्क केला तेव्हा प्राधिकरणाने म्हटले, प्रिय रेसिडेंट, अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरची सुविधा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. तुम्ही इतर वॅलिड अॅड्रेस प्रूफच्या या लिस्ट (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf) पैकी कोणताही एका अॅड्रेस प्रूफद्वारे आपला अॅड्रेस अपडेट करू शकता.
–
आता या डॉक्युमेंट्सने अपडेट करू शकता अॅड्रेस
1. पासपोर्ट
2. बँक स्टेटमेंट/ पासबुक
3. पोस्ट ऑफिस अकाऊंट स्टेटमेंट/ पासबुक
4. रेशन कार्ड
5. वोटर आयडी
6. ड्रायव्हिंग लायसन्स
7. गव्हमेंट फोटो आयडी कार्ड/ एखाद्या पीएसयूद्वारे जारी सर्व्हिस फोटो आयडेंटिटी कार्ड
8. वीज बिल (तीन महिन्यापेक्षा जास्त जुने नाही)
9. पाण्याचे बिल (तीन महिन्यापेक्षा जास्त जुने नाही)
10. टेलीफोन लँडलाईन बिल (तीन महिन्यापेक्षा जुने नाही)
11. प्रॉपर्टी टॅक्स रिसीट (एक वर्षापेक्षा जास्त अगोदरचा नाही)
12. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (तीन महिन्यापेक्षा जास्त जुने नाही)
13. इन्शुरन्स पॉलिसी
14. बँकेच्या लेटरहेडवर जारी पत्र (फोटोसह)
15. रजिस्टर्ड कंपनीच्या लेटरहेडवर जारी पत्र (फोटोसह)
याशिवाय तुम्ही नरेगा जॉब कार्ड, शस्त्र लायसन्स, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फायटर कार्ड, किसान पासबुक, CGHS/ECHS Card च्या द्वारे सुद्धा आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करू शकता.
आधार कार्डमध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो. ही प्रक्रिया खुप सोपी आहे.
Web Titel : aadhaar card now adhaar card holders can not update their address with address validation letter know aadhaar card update how to change address online
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update