Aadhaar चा अड्रेस अपडेट करणे झालं एकदम सोपे, अवलंबा ‘ही’ ऑनलाइन पद्धत; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  Aadhaar | अनेकदा अशी स्थित येते जेव्हा आपल्या आधार कार्डवर एका शहराचा पत्ता असतो, आणि आपण दुसर्‍या शहरात राहण्यासाठी जातो. अशावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. UIDAI घरबसल्या ऑनलाइन अ‍ॅड्रेस अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. (Aadhaar) यामध्यमातून तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून अड्रेस अपडेट करू शकता.

जाणून घेवूयात संपूर्ण प्रक्रियेबाबत :

UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा, येथे एक My Aadhaar चा एक टॅब दिसेल.

माय आधारवर क्लिक करून दुसर्‍या ओळीत Update Your Aadhaar चा पर्याय दिसेल.
अपडेटच्या पर्यायात गेल्यानंतर तिसर्‍या ऑपशन your address online वर क्लिक करा.

या ऑपशनवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल, जिथे खाली गेल्यानंतर तुम्हाला Proceed to Update Address वर क्लिक करावे लागेल, ज्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
त्या पेजवर आपला आधार नंबर टाकून कॅप्चा व्हेरिफिकेशन करून सेंड OTP वर क्लिक करावे लागेल, ज्यानंतर आधार रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपीचा मेसेज येईल.
हा ओटीपी एंटर केल्यानंतर Data Update Request च्या ऑपशनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर अ‍ॅड्रेस ऑपशनवर क्लिक करून तुम्ही नवीन पत्ता अपडेट करू शकता.

नवीन अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी सध्याच्या अड्रेसची पूर्ण माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्र म्हणजे अ‍ॅड्रेस प्रूफचा रंगीत स्कॅन फोटो अपलोड करावा लागेल.
हे अपडेट केल्यानंतर तुमचा सध्याचा अड्रेस अपडेट होईल.

 

Web Title : aadhaar news update your adhaar address online with the help of these simple steps

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत आणखी वाढ; वसुली प्रकरणात दाऊदचा निकटवर्तीय छोटा शकीलची एंन्ट्री?

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी लुटले

Pune Corporation | महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती