Aadhaar कार्डासोबत जोडलेला मोबाईल नंबर बंद झालाय?, काळजी करू नका; असा बदला नवा नंबर

नवी दिल्ली : आधार कार्ड हे सध्या सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. याचा वापर विविध ठिकाणी करावा लागतो. अशावेळी आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक ठरते. आधारची पडताळणी करताना येणारा ओटीपी हा लिंक मोबाईलवर येत असल्याने आधारशी मोबाईल लिंक असणे आवश्यक ठरते. अनेकदा आधारशी लिंक मोबाईल नंबर आपल्याकडून नकळत बंद केला जातो, अशावेळी मोठी अडचण निर्माण होते. परंतु, आता काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण युआयडीएआयने बदललेला नवीन नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे, ती जाणून घेवूयात…

या आहेत महत्वाच्या स्टेप्स

* तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. युआयडीएआयच्या संकेतस्थळावर जाऊन नजिकच्या आधार केंद्राची माहिती मिळवा.

* आधार केंद्रामध्ये जाण्यासाठी तुमच्या सोयीनुसार अपॉईंटमेंट बुक करा. पॉइंटमेंटनुसार ठरलेल्या वेळी आधार केंद्रात जा.

* आधार केंद्रावर दिला जाणारा आधार अपडेट फॉर्म भरा.

* फक्त फॉर्म भरुन आधार केंद्रातील अधिकार्‍याकडे दिल्यानंतर ठराविक शुल्क भरावे लागेल.

* आधार कार्डाबाबत कोणतेही बदल करण्यासाठी 50 रूपये शुल्क आकारले जाते.

आधार केंद्रातील अधिकारी एक स्लिप दिली जाईल. त्यावर युआरएन नंबर असतो. या नंबरवरुन अर्जाच्या सध्याच्या स्थितीबाबत संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने पाहता येते. शिवाय 1947 या क्रमांकावर कॉल करून सुद्धा अपडेट केल्याची स्थिती जाणून घेता येईल.