Aaditya Thackeray On BJP & Eknath Shinde Group | आदित्य ठाकरेंची बोचरी टीका, म्हणाले – पेंग्विन आणल्यानं महापालिकेला 50 कोटी मिळाले, चित्त्यांचं काय झालं बघा

मुंबई : Aaditya Thackeray On BJP & Eknath Shinde Group | मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena Thackeray Group) आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केले होते, त्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत, वैयक्तिक टीका सुद्धा केली होती. आता पुन्हा एकदा आदित्य यांनी बोचरी टीका केली आहे. पेंग्विन आणल्याने महापालिकेला ५० कोटी मिळाले, चित्त्याचे काय झालं बघा, असे म्हणत आदित्य यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरच निशाणा साधत राज्यातील भाजपा नेत्यांना डिवचले आहे. (Aaditya Thackeray On BJP & Eknath Shinde Group)

मुंबईतील इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकार
आणि शिंदे सरकारवर थेट हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही पेंग्विन आणल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेला
५० कोटी मिळाले आहेत. आम्हाला प्राणीसंग्रहालयात बरेच प्राणी मिळाले. आज किमान ३० हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देतात. त्यातून, महापालिकेला उत्पन्न सुरू झाले. मात्र, देशात आणलेल्या चित्त्यांचे काय झाले, आधी ते पहा. (Aaditya Thackeray On BJP & Eknath Shinde Group)

आदित्य ठाकरे म्हणाले, मी रस्त्ये तसेच फर्निचर घोटाळ्यासह अनेक आरोप केले. भ्रष्टाचार उखडून टाकण्यावर ते ठाम असतील तर त्यांची चौकशी का होत नाही? त्यांचा तपास नेहमीच एकतर्फी का होतो? संजय राऊत, अनिल देशमुख यांच्या सुटकेचे आदेश पहा आणि हे कसे सूडबुद्धीने केले जात आहे ते तुम्हाला दिसेल. भाजपाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या सर्वांचे स्वागत केले आहे. कर्नाटकमधील तत्कालीन भाजपा सरकार ४० टक्के असेल तर हे १०० टक्के भ्रष्ट सरकार आहे. हे सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांच्या संगनमताचे आहे.

शिंदे सकाळी लवकर उठत नाहीत

इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचे सेशन पाठोपाठ होते. त्याऐवजी, एकत्र सेशन घेऊ.
मी एकटा, त्यांच्या बाजूने येतील तेवढे येऊ द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले होते.

पण, एकनाथ शिंदे सेशनसाठी आलेच नाहीत. ठाकरे यांचे सेशन संपायला आले असताना निवेदिकेने म्हटले की,
अचानक दिल्लीला जावे लागल्याने एकनाथ शिंदे येऊ शकत नाहीत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आरोप केला होता की,
ते सकाळी उठतच नाहीत आणि त्यांच्यामुळे माझ्या दोन फ्लाईट मिस झाल्या होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API Sarika Jagtap | किशोरवयीन मुलींनी व्यक्त व्हावे – सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप