Aamir Khan | ‘अकेले हम अकेले तुम’ अमिर खानच्या भावाचाही झाला घटस्फोट, पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अभिनेता अमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. 15 वर्षे संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमिर खान (Aamir Khan) नंतर आता त्याचा भाऊ हैदर अली (Haider Ali Khan) याचा देखील घटस्फोट झाल्याचे समोर येत आहे. हैदर अली खान याने पत्नी आणि लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री इव्हा ग्रोव्हर (Eva Grover) सोबत घटस्फोट घेतला आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच चित्रपटात देखील ती दिसली होती.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दोघांचा झाला होता प्रेमविवाह

हैदर अली खान आणि इव्हा ग्रोव्हर यांचा प्रेमविवाह झाला होता. हैदर हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ताहीर हुसेन (Tahir Hussain) यांचा मुलागा आहे. तर अभिनेता अमिर खान याचा सावत्र भाऊ आहे. हैदरने ‘दिल तो दिवाना है’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हैदर आणि इव्हा यांना एक मुलगी आहे.

इव्हाचे गंभीर आरोप

इव्हा आणि हैदर यांचा विवाह झाल्यानंतर एक वर्षानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले या वादाचे रुपांतर घरगुती हिंसेत झाले. इव्हाने त्यांचा संसार टिकवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. इव्हाने हैदरवर घरगुती हिंसेचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. टीव्ही अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

म्हणून हा निर्णय घेतला

इव्हाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 2008 मध्ये तिने हैदरपासून घटस्फोट घेतला. हा खूप कठीण प्रसंग होता. परंतु रोजच्या हिंसेपासून सुटका हवी होती. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे इव्हाने सांगितले.

इव्हाने फेसम शो ‘ऑफिस-ऑफिस’ (Office-Office) आणि ‘माय फ्रेंड गणेशा’ (My Friend Ganesha) यामध्ये काम केले आहे. इनटॉलरेंसच्या मुद्यावर ज्यावेळी अमिर खानने विवादास्पद वक्तव्य केलं होतं. त्यावेळी हैदर अमिरच्या मदतीला धावून गेला होता. तेव्हा हैदरवर टीका झाली होती. नुकताच अमिर आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे हैदर देखील चर्चेत आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title :  aamir khans brother haider ali was married to actres eva grover later they divorced

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान