Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं एकमत, निर्णयाचा पुनर्विचार करण्याची अमित ठाकरेंची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aarey Metro Car Shed Issue | आरे कारशेड विरोधात पर्यावरणवादी पुन्हा एकवटणार आहेत. पर्यावरणप्रेमींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील आरे बचाव मोहिमेसाठी मैदानात आले आहेत. अमित ठाकरे यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) ‘आरे’च्या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रो कारशेड आरे (Aarey Metro Car Shed Issue) जंगलातच करण्याचा नव्या सरकारने निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. अमित ठाकरे यांच्या भूमिकेवरुन आरे बाबत अमित आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या दोन भावांमध्ये एकमत असल्याचे पाहायला मिळतंय.

 

काय म्हटले अमित ठाकरे यांनी?
अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करुन नव्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. अमित ठाकरे म्हणतात, मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं. आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको.

 

आपलं पर्यावरण उद्धवस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही,
याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं.
नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेड बाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा,
अशी आग्रहाची विनंती अमित ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला केली आहे.

 

Web Title :- amit raj thackeray letter to cm eknath shinde and deputy cm devendra fadanvis over aarey metro car shed issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

 

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचे वक्तव्य, बँकांना दिले हे महत्वाचे निर्देश