Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Assembly Speaker Election | संपूर्ण राज्याला धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Deputy CM Devendra Fadnavis), असे समीकरण राज्यात आल्यानंतर आता भाजप (BJP) आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले अ‍ॅड. राहुल नार्वेकर (Adv. Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker Election) उमेदवारी दिली आहे.

 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) रविवारी (दि.3) होणार आहे. दरम्यान शिवसेनेने आपला उमेदवार उभा केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेने राजन साळवी (Rajan Salvi) यांना निवडुन आणण्यासाठी सर्व आमदारांना व्हीप बजावला (Shivsena Whip Issued) आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत साळवी आणि नार्वेकर यांच्यात सरळ लढत होणार आहे.

 

शिवसेनेने व्हिप काढल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेने जारी केलेला व्हिप आम्हाला लागू होत नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचं संख्याबळ आहे. आम्ही बहुमत सिद्ध करु, असं एकनाथ शिंदे यांनी गोवा विमानतळावरुन (Goa Airport) मुंबईसाठी निघताना सांगितले. शिंदे गटातील बंडखोर आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. सुरुवातीला गुजरात, आसाम मग गोवा असा प्रवास करुन हे सर्व आमदार 11 दिवसांनी मुंबईत परतणार आहेत.

शिवसेनेच्या पक्षादेशात काय लिहलं?
महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन (Maharashtra Assembly Special Session)
रविवार, दिनांक 3 जुलै 2022 आणि सोमवार 4 जुलै 2022 रोजी विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
रविवारी 3 जुलै रोजी महाराष्ट्र सभागृहात अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी शिवसेना पक्षातर्फे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून साळवी यांना मतदान करावे, असा पक्षादेश आहे.

 

Web Title :- Assembly Speaker Election | the shivsena whip issued by shiv sena does not apply to us said chief minister eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

 

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

 

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!