Aashiqui 3 | आशिकी 3 मध्ये फातिमा शेख नसणार कार्तिक आर्यनची हिरोईन; महेश भट्ट शोधत आहेत नवीन चेहरा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील लव लाईफ वर आधारित सुपरहिट चित्रपट सिरीजमध्ये आशिकी, आशिकी 2 (Aashiqui 2) नंतर आता आशिकी 3 (Aashiqui 3) या चित्रपटाची तयारी सुरु आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Actor Kartik Aaryan) यामध्ये लीड एक्टरचे काम करणार आहे. कार्तिकचा सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट गाजत असून तो पुढील चित्रपटाच्या तयारीस लागला आहे. आशिकी 3 (Aashiqui 3) मध्ये कार्तिक आर्यन सोबत हिरोईन म्हणून कोण काम करणार याबाबत निर्माते महेश भट्ट यांनी माहिती दिली आहे.

आशिकी (Aashiqui) व आशिकी 2 हे चित्रपट आणि त्यातील गाणी ही प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. आता याचा पुढील आशिकी 3 हा चित्रपट येणार आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका कार्तिक आर्यन करणार असल्याचे फिक्स असून हिरोईन (Aashiqui 3 Heroine) मात्र अद्याप ठरवण्यात आलेली नाही. यामध्ये हिरोईन म्हणून फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) असणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र यावर चित्रपट निर्मात्यांनी नकार दिला असून तिचे नाव मधूनच कुठून आले हे माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली. फातिमा आधी आशिकी 3 साठी कतरिना कैफ (Katrina Kaif) व दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या नावाचीही चर्चा होती.

आशिकी चित्रपटाचे निर्माते महेश भट्ट (Producer Mahesh Bhatt) यांनी आशिकी 3 चित्रपटाबाबत विस्तृत मत मांडले आहे. महेश भट्ट यांनी कार्तिकचे नाव घेत आमचा हिरो लॉक झाला आहे आणि हे सर्वांना माहित आहे. आणि फिमेल लीडच्या निवड करण्याचे महत्त्वाचे काम स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर केले जाईल. स्क्रिप्टशिवाय चित्रपट काही नाही.

महेश भट्ट म्हणाले की, “मी प्रपोजल मेकर नाही, मी सिनेमा बनवतो. माझ्यासाठी आधी स्क्रिप्ट येते आणि नंतर कास्ट होते. यासोबतच आशिकी या चित्रपटांच्या मालिकेसाठी (Aashiqui Film Series) संगीतही खूप महत्त्वाचे आहे. (Aashiqui Film Song) गाण्यांमुळे भाग 1 व भाग 2 खूप उंचीवर पोहचला. आशिकी 3 साठी आम्हाला तितकाच उत्तम संगीत स्कोअर हवा आहे. आणि फिमेल लीडबद्दल सांगायचे तर आम्ही खरं तर एका नवीन मुलीच्या शोधात आहोत जी आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यन सोबत काम करेल. पहिल्या आशिकी चित्रपटासाठी फ्रेश चेहरा खूप मोठा होता आणि संगीतही होते. कदाचित आपण नवीन मुलीला कास्ट करू शकतो. पण मला असे म्हणायचे आहे की आम्हाला कोणतीही घाई नाही. प्रथम स्क्रिप्ट पूर्ण होऊ द्या.”
आशिकी 3 चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असून पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गवर आहे.

Web Title :   Aashiqui 3 | mukesh bhatt reveals fatima sana shaikh not part of aashiqui 3 opposite kartik aaryan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्