Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Buldhana Bus Accident | शनिवारी सकाळी समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ झाला. बस खांबाला धडकून डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला. या अपघातावरुन (Buldhana Bus Accident) आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. या घटनेवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हटले होते. यावर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार रवी राणा म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून विदर्भाला जोडणारा मार्ग आहे. टेक्निकल टीमने बसून यावर अभ्यास केला पाहिजे. संजय राऊत ज्या मार्गाला शापित म्हणतात, त्या मार्गाच नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आहे. त्याला शापित म्हणणं चुकीचे आहे आणि संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) शापित आहेत, असं म्हणत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

अपघातावर राजकारण नको – नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनी देखील संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शापित आहेत. तर या अपघातावर (Buldhana Bus Accident) राजकारण करु नये. तसेच राजकारण करणाऱ्यांचे दु:ख वाटते, तर संजय राऊत यांच्या बातम्या माध्यमांनी दाखवू नयेत. वारंवार होत असलेल्या अपघातावर तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करावा. तसेच येणाऱ्या काळात सृद्धी महामार्गावर अपघात कसे थांबतील याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष देतील, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

Web Title :  Buldhana Bus Accident | the road which is called cursed is named balasaheb thackeray ravi ranas reply to sanjay raut on buldhana bus accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा