Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

पोलीसनामा ऑनलाइन – Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य सिनेसृष्टी सध्या ट्रेन्डिंगमध्ये असून त्यांचे चित्रपटही (South Movie) सुपरहिट ठरत आहेत. हे कलाकार प्रेक्षकांना भावत असून अनेकदा या कलाकारांमधील आपापसांतील प्रेम आणि आदर भावना दिसून येते. आता अभिनेत्री काजल अग्रवालने (Actress Kajal Aggarwal) अभिनेत्री रकूल प्रित सिंग (Rakul Preet Singh), तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि समंथा रुथ प्रभू यांचे कौतुक करुन त्यांना सेल्फ मेड ॲक्टर म्हटले आहे.

अभिनेत्री काजल अग्रवालने सोशल मीडियावर ‘आस्क मी समथिंग’ (Ask Me Anything) असे सेशन घेतले. यावेळी चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे काजलने मनमोकळेपणाने दिली. यावेळी एका चाहत्याने तिला रकुल, सैम आणि तमन्ना सोबतची मैत्री कशी आहे असा प्रश्न केला ? यावेळी उत्तर देताना तिने आठवणींना उजाळा दिला. तिने उत्तरामध्ये सांगितले की, या तिघीही खूप सुंदर, सेल्फ मेड, कमिटेड आणि सॉलिड मुली आहेत. आमच्या एकत्र काही छान आठवणी आहेत. आम्हाला एकमेकींसोबत वेळ घालवायला आवडतो. कार्यक्रम, काम, हॉटेल, विमानतळ अशा ठिकाणी आमची भेट होतेच. काजलने हे उत्तर देतान चौघींचा एक स्टेजवरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये समंथा आणि रकुल एकमेंकींकडे बघून स्माईल करत आहेत तर काजल आणि तम्मना कॅमेऱ्याकडे बघत आहेत. काजलने तिच्या उत्तरात रकुल प्रीत सिंग, तमन्ना भाटिया आणि समंथा रुथ प्रभू यांनाही टॅग केले.

अभिनेत्री समंथाने (Samantha Ruth Prabhu) आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही स्टोरी रिमेन्शन केली आहे. आणि यामध्ये रेड हार्ट टाकून आपले प्रेम व्यक्त केले आहे. तसेच अभिनेत्री रकुलने सुद्धा ही स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने ‘Aww Kajjj’ असे लिहित रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

या दाक्षिणात्य चारीही अभिनेत्री सध्या यशाच्या शिखरावर असून नवनवीन प्रोजेक्ट घेत आहेत. अभिनेत्री काजल (Actress Kajal Aggarwal) ही लवकरच ‘अखिल दोगला का सत्यभामा’ (Akhil Dogla ka Satyabhama) व ‘इंडियन 2’ (Indian 2) य़ा चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री तमन्नाचा बहुचर्चित ‘लस्ट स्टोरीज् 2’ (Lust Stories 2) हा सिनेमा गाजत आहे तर समंथा बॉलीवुडमध्ये (Samantha In Bollywood) आपली ओळख निर्माण करत आहे. ती लवकरच ‘खुशी’ (Khushi) चित्रपटात झळकणार आहे.

Web Title :  Actress Kajal Aggarwal | kajal aggarwal talks about samantha ruth prabhu tamannaah rakul preet singh friendship

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा