Abdul Sattar | न्यायलयाच्या निकालाचा सन्मान; संजय राऊत यांना शुभेच्छा – अब्दुल सत्तार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सुटकेवर मी त्यांना शुभेच्छा देतो, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले आहेत. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आज (दि. 10) विभागीय आयुक्त कार्यालयात शेतीच्या नुकसानीची पाहणी करुन पीक विम्यासंदर्भात बैठकीत बोलत होते.

 

संजय राऊत यांचा जामीन बुधवारी न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली आहे. त्यावर विविध नेते आणि राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील संजय राऊत प्रकरणात माफक प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार यांनी मागील काही दिवासांपूर्वी राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावरुन राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे सत्तार यांनी जास्त बोलण्याचे टाळले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या आणि मला राजकीय प्रश्न विचारु नका, असे पत्रकारांना सांगितले. तसेच त्यांना त्यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता, त्यांनी मी सुरक्षित आहे, येवढेच सांगितले.

 

विभागीय आयुक्त कार्यलायत पीक विम्याच्या संदर्भात बैठक पार पडली. यानंतर सत्तार माध्यामांशी बोलत होते.
सत्तार म्हणाले, राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते वाघ आहेत की नाही, हे मला माहित नाही.
न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला पाहिजे. मी अधिक बोललो तर तुम्ही मला नवीन प्रकरणात अडकवाल.

 

Web Title :-  Abdul Sattar | Respect for court decisions; Best wishes to Sanjay Raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू