Abdul Sattar | दोन दिवसांत पंचनामे करुन विधिमंडळात भरपाईची घोषणा करणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अद्याप पंचनामे झाले नसल्याने त्यांना मदत मिळालेली नाही. यावरून विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे 1 लाख 39 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत नुकसानीचे पंचानामे (Panchnama) पूर्ण करुन विधिमंडळात नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री करतील असे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितले. ते नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलत होते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नुकसानग्रस्त पीक पाहणीसाठी आज नंदुरबार तालुक्यातील आष्टे व ठाणेपाडा परिसरात आले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit) उपस्थित होते. सत्तार म्हणाले, अवकाळी पावसामुळे राज्यात 1 लाख 39 हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. नंदुरबार, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात कांदा, गहू, बाजरी, पपई, कलिंगडसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या सहा महिन्यात संकटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वाधिक 12 हजार कोटींची मदत राज्य सरकारने केल्याचेही सत्तार यांनी सांगितले.

अब्दुल सत्तारांना रात्रीचं जास्त दिसतं

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि.21) नाशिकच्या निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी
जाणार होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र दुपारी येणारे सत्तार रात्री पोहचले.
त्यानंतर त्यांनी कुंभारी गावात एका द्राक्ष बागेची पाहणी केली. मात्र, या पाहणी दौऱ्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP)
नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीका केली आहे.

आव्हाड म्हणाले, आपण भाग्यवान आहोत की, रात्रीचं दिसणारा माणूस हा महाराष्ट्राचा कृषीमंत्री आहे.
दिवसा नाही दिसलं तरी चालेल, कारण रात्रच महत्त्वाची असते. हास्यास्पद आहे हे सगळं.
अजून हे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. पंचनामे झालेले नाहीत.
शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळालेला नाही, शेतकऱ्यांचा कोणी विचारत नाही, असे आव्हाड म्हणाले.

Web Title : Abdul Sattar | the panchnama of unseasoned rain will be completed in two days and the compensation will be announced in the legislature asys agriculture minister abdul sattar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 3 लाखांच्या कर्जाचे 4 लाख 20 हजार परत केल्यानंतरही आणखी 10 लाखांची मागणी; पैसे न दिल्यास गहाण ठेवलेली गाडी पेटवून देण्याची धमकी, दोघा सावकारांवर गुन्हा दाखल

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरींच्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं, पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा

Devendra Fadnavis On Chaskaman | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – देवेंद्र फडणवीस