Abhidnya Bhave | गणरायाची आरास करण्यावरुन अभिनेत्री अभिज्ञा भावे होतीये ट्रोल; ‘झाड का तोडलं’ नेटकऱ्यांचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन – Abhidnya Bhave | मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिज्ञा तिच्या लाईफ अपडेट शेअर करत असते. यावेळी देखील तिच्या गणपती बाप्पांची आरास करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मनोरंजन विश्वातील इतर कलाकारांप्रमाणे अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने देखील भक्तीभावाने घरी गणरायाचे स्वागत केले. यावेळी तिने स्वामी समर्थांच्या रुपातील गणराय विराजमान केले आहेत आणि स्वामी ज्याप्रमाणे झाडाच्या पुढे बसतात त्याप्रमाणे गणरायाची आरास केली आहे. मात्र या आरासवरुन सोशल मीडियावर अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला ट्रोल केले जात आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अभिज्ञा भावे ही स्वामी समर्थांची भक्त आहे. तिचा पती मेहुल पै याला देखील आजारपणामध्ये स्वामी समर्थांची प्रचिती आली होती. यावर्षी अभिज्ञाने आपल्या घरी स्वामींरुपी गणराय घरी विराजमान केला आहे. मोठ्या थाटामध्ये तिने गणरायाचे स्वागत आणि आरास केली आहे. यामध्ये तिने स्वामी झाडापुढे वास्तव्यास होते त्याचप्रमाणे गणपतीसाठी आरास केली. मात्र यासाठी तिने खरे झाड कापून आरास केली. खऱ्या झाडाचे खोड कापून गणरायामागे झाड उभे केले आहे. तिची आरास सर्वांना आवडली असली तरी देखील डेकोरेशनसाठी खरे झाड का कापले असा सवाल नेटकऱ्यांनी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला विचारण्यास सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री अभिज्ञा भावे ही तिच्या आरासमुळे ट्रोल होत आहे. (Abhidnya Bhave)

अभिज्ञाने खऱ्या झाडाचे खोड आणि पानं वापरल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की,
‘तू देखावा तर सुंदर केलास पण त्यासाठी खरं झाड का तोडलंस’ असा सवाल केला आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की,
‘खूप छान पण झाड तोडलं याचं वाईट वाटलं. असो आता त्याबदल्यात 4 झाडं लावा.’ असा सल्ला दिला आहे.
एका युजरने लिहिले की, ‘सुंदर.. पण डेकोरेशनसाठी झाड का तोडलं??’ अशा अनेक कमेंट सध्या अभिनेत्री अभिज्ञा भावे
हिच्या सोशल मीडिया पोस्ट खाली येत आहेत. डेकोरेशन सुंदर केले असले तरी खरे झाड तोडल्यामुळे अभिनेत्री अभिज्ञा ट्रोल होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट